Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रअण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना ‘राजर्षी शाहू सन्मान’ पुरस्कार.

अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना ‘राजर्षी शाहू सन्मान’ पुरस्कार.

अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना ‘राजर्षी शाहू सन्मान’ पुरस्कार.

आजरा.- प्रतिनिधी .

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समाजोपयोगी व प्रेरणादायी योगदानाबद्दल अण्णा भाऊ संस्था समूह, प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना ‘राजर्षी शाहू सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवभारत-नवराष्ट्र समूहाच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविणे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
श्री. चराटी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ संस्था समूहाने पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण व समाजकल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.