Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजिल्हा जनगणना पुस्तिका तयार करण्यासाठी आजरा तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न

जिल्हा जनगणना पुस्तिका तयार करण्यासाठी आजरा तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न

जिल्हा जनगणना पुस्तिका तयार करण्यासाठी आजरा तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न

आजरा : – प्रतिनिधी.

जिल्हा जनगणना पुस्तिका २०२६ तयार करण्यासंदर्भात एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडले.शिबिरास जिल्हा समन्वयक जनगणना अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार समीर माने आणि निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा जनगणना पुस्तिकेचे महत्त्व अधोरेखित करताना लोकसंख्या, घरे, शेती, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांची गावनिहाय अचूक माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर वेळेत अपडेट करण्याबरोबरच कागदी आणि डिजिटल नोंदी ठेवण्यावर भर देण्यात आला. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी माहितीची खातरजमा करूनच पुस्तिकेत समावेश करावा, असेही सांगण्यात आले.

तालुक्यांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राथमिक मसुदा आणि ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम पुस्तिका सादर करण्याचे वेळापत्रकही यावेळी जाहीर करण्यात आले. या शिबिराला १९ ग्राम महसुली अधिकारी, ४९ ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांनी पुस्तिकेचे स्वरूप, नवे बदल आणि डेटा एंट्री प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.