HomeUncategorizedकिणे - पोश्रातवाडी ग्रामिण रस्ता क्र.६६ - खुला करून मिळावा संबंधित विभागांकडे...

किणे – पोश्रातवाडी ग्रामिण रस्ता क्र.६६ – खुला करून मिळावा संबंधित विभागांकडे मागणी.

किणे – पोश्रातवाडी ग्रामिण रस्ता क्र.६६ – खुला करून मिळावा संबंधित विभागांकडे मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

किणे ते पोश्रातवाडी ग्रामिण रस्ता क्र.६६ मध्ये रस्त्यामध्ये अतिक्रमण करुन, रस्ता वहातुकीस बंद करुन, जेसीबीच्या वापराने पुन्हा अतिक्रमण करुन कोर्टाच्या आदेशाचा /ना. हायकोर्ट यांच्या आदेशाचा भंग केलेल्या लोकांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत. येथील नागरिकांनी, आजरा तहसीलदार, पंचायत समिती बांधकाम विभाग सह संबंधित विभागाकडे यांच्याकडे तक्रार केली आहे.
तसेच रिट पिटीशन नं. ४५/३४/२०२३ अन्वये ना. हायकोर्ट यांनी संबंधित नागरिकांना आदेशातील अ.क्र.नं.५ प्रमाणे प्रतिवादी क्र.१ ते ५ अगर कोणीही व्यक्ती नातेवाईक, एजंट, नोकर यांनी किणे पोश्रातवाडी सार्वजनिक रस्त्यावर पुन्हा केव्हाही कोणत्याही प्रकारचा अडथळा करु नये व त्या रस्त्याच्या वापरास वादी अगर अन्य कोणालाही कोणत्याही प्रकारची हरकत करु नये अशी कायमची मनाई / ताकित करण्यात येत आहे. असा प्रकार केल्यास तो भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ (२) अन्वये शास्तीस पात्र राहील. असा आदेश करुन सुद्धा वरील लोकांनी आदेशाचा अवमान केलेला आहे. व सदरचा निर्णय वादी क्र.१ ते ३८ प्रतिवादी
लोकांनी रस्ता अतिक्रमण व बंद करणेचे काम केले असलेमुळे व सदर रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी जबाबदारीने एस एस नाईक उपअभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद / पंचायत समिती या विभागाकड सोपविलेला आहे. याबाबत यापूर्वी अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज दिलेले आहेत. तरीसुद्धा त्यांचेकडून कोणतीही कारवाई होत नाही. जनतेला वेठीस धरणेचा प्रयत्न आहे. रस्त्यातील अडथळा दूर करुन पुर्ववत रस्ता खुला करुन वाहन व नागरिक /शेतकरी यांच्यासाठी मुक्त करुन देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असून त्याबाबत त्वरित कारवाई व्हावी. अतिक्रमण झालेला रस्ता रिकामी करून मिळावा. याबाबतची निवेदनाने मागणी अरुण नारायण पाटील, नारायण शंकर केसरकर, विजय विष्णू केसरकर यांनी केली आहे.

चौकट.

याबाबत पंचायत समिती बांधकाम विभाग यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित रस्ताप्रश्नी वादी व प्रतिवादी यांना बोलवून लवकरच विषय मार्गी लावण्यात येईल असे श्री.सुर्यकांत नाईक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.