दिवसा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात –
आजरा.- प्रतिनिधी.
दिवसा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात – सोन्याचे दागिन्यासह गुन्ह्यात वापरलेली वाहन असा एकूण ८,२२,९२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, दोन घरफोडी गुन्हे उघड – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
दिनांक २५/१०/२०२६ रोजी १२.०० वा. ते १३.०० वा.चे मुदतीत बहीरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथील संजय दत्तात्रय इंचनाळकर यांचे रहाते घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेबाबत आजरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २४०/२०२६ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे दिनांक २५/१०/२०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दिवसा घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. नीलोत्पल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
मा.पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री.सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकासह तात्काळ सदर गुन्ह्याचे ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचे कार्यपद्धतीबाबत व गुन्ह्याचे ठिकाणी फिरत असले संशयित व्यक्तिबाबत घटनास्थळाचे आसपास राहणाऱ्या लोकांच्याकडून माहिती घेवून घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराची पडताळणी करीत असताना पोलीस अंमलदार रोहीत मर्दाने, समीर कांबळे, संदीप गायकवाड, राजू कोरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील चोरलेले दागिने विकण्यासाठी पिंपळगाव, ता. कागल गावचे हद्दीतील कागल ते निढोरी जाणारे रोडवर येणार आहे. मिळाले बातमीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे तपास पथकाने आज दि.३१/१०/२०२६ रोजी कागल ते निढोरी रोडवर सापळा लावून आरोपी नामे कपिल प्रकाश सातवेकर व.व.३१, रा. बसवेश्वर देवालय, पिंपळगाव खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेवून त्यांचे कब्जातुन सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ८,२२,९२०/- किंमतीचा मुद्देमाल योग्य ती कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करण्यात आला असून कपिल प्रकाश सातवेकर याच्याकडे केले चौकशीत त्याने, आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. २४०/२०२६ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे व मुरगूड पोलीस ठाणे गु.र.नं.३२७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(अ) प्रमाणे असे दोन गुन्हे केलेची कबुली दिली आहे. जप्त मुद्देमालासह आरोपी नामे कपिल प्रकाश सातवेकर यास आजरा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
आरोपी नाव कपिल प्रकाश सातवेकर याचेवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे चोरीचे १५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, श्री.नीलोत्पल भा.पो.से., मा.अपर पोलीस अधीक्षक , श्री. आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, योगेश गोसावी, शुभम संकपाळ, अमित सर्जे रोहीत मर्दाने, समीर कांबळे, संदीप गायकवाड, राजू कोरे, सतिश जंगम, संजय हुंबे, अशोक पवार, सतिश सुर्यवंशी, अमित मर्दाने यांनी केली आहे.
