Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र राज्यातील केमिस्ट बंद मध्ये आजरा तालुका यशस्वीपणे बंद करून सहभाग.

महाराष्ट्र राज्यातील केमिस्ट बंद मध्ये आजरा तालुका यशस्वीपणे बंद करून सहभाग.

महाराष्ट्र राज्यातील केमिस्ट बंद मध्ये आजरा तालुका यशस्वीपणे बंद करून सहभाग.

आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्यातील केमिस्ट बंद यशस्वी. पंतप्रधानांना स्थानिक प्रशासनामार्फत निवेदन दि. २० मे २०२६ रोजी, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील औषध विक्रेत्यांनी बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्री, वैध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री व होम डिलिव्हरी, तसेच ऑनलाइन औषध विक्री प्लटफॉर्मदवारे दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती (डीए। डिस्काउंटिंग) यांच्या विरोधात एकदिवसीय प्रतीकात्मक बंद यशस्वी करण्यांत आला.

AIOCD तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शविला. राज्य संघटनेचे अध्यक्ष – जगन्नाथ शिंदे आणि महासचिव अनिल नावंदर यांनी माहिती दिली की, या बंद दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उ‌द्देशून तयार केलेले निवेदन राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (SDM) आणि तहसीलदार यांच्या मार्फत सादर करण्यात आले. राज्यातील विविध भागात मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या निवेदनामध्ये खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आल्या

  1. बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्री.
  2. वैध व पडताळणी केलेल्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री व घरपोच सेवा.
  3. ऑनलाइन प्लटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे लाखो लहान व परवानाधारक केमिस्ट व्यवसायिकांचे होणारे नुकसान.

संघटनेने GSR 817(E) आणि GSR 220 (E) त्वरित मागे घेण्याची मागणी देखील केली असून, या तरतुदींचा गैरवापर ऑनलाइन प्लाटफॉर्म आणि क्विक कॉमर्स कंपन्यांकडून अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्रीसाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केमिस्ट बांधवांनी गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की औषधे ही सामान्य वस्तू नसून, योग्य पडताळणीशिवाय ऑनलाइन विक्री होणे हे सार्वजनिक आरोग्य, रुग्ण सुरक्षा आणि औषधे व संदिर्यप्रसाधने कायदा (Drugs & Cosmetics Act) अंतर्गत असलेल्या नियामक व्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.

फार्मास्युटिकल व्यापार क्षेत्राने हेही स्मरण करून दिले की कोविड महामारीच्या काळात देशभरातील केमिस्टांनी फ्रंटलाइन हेल्थकेअर सहाय्यक म्हणून अथक सेवा देत जनतेला औषधांचा अखंड पुरवठा सुनिश्चित केला होता. बेकायदेशीर ऑनलाइन व्यवहारांविषयी वारंवार निवेदने आणि पुरावे सादर करूनही संबंधित प्राधिकरणांकडून अ‌द्याप कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही.
संघटनेने केंद्र सरकारला रुग्ण सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि लाखो लहान परवानाधारक केमिस्ट व त्यांच्या कर्मचान्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने तातडीने योग्य ती सुधारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात बंद पूर्णपणे शांततेत पार पडला असून राज्यातील औषध विक्रेत्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच संघटनेच्या मानवतावादी भूमिकेचा भाग म्हणून गरजू रुग्णांना अत्यावश्यक आणि आपत्कालीन औषधे उपलब्ध करून देण्यात आली. राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील, व आजरा तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन बंद यशस्वी केला. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.