Home कोंकण - ठाणे महिलांना हेरून, फसवून, हातचलाखी करून अंगावरील दागिने चोरणारे दोन चोरटे उत्तुर बाजारातून...

महिलांना हेरून, फसवून, हातचलाखी करून अंगावरील दागिने चोरणारे दोन चोरटे उत्तुर बाजारातून ताब्यात.- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

महिलांना हेरून, फसवून, हातचलाखी करून अंगावरील दागिने चोरणारे दोन चोरटे उत्तुर बाजारातून ताब्यात.- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

आजरा.- प्रतिनिधी.

आठवडा बाजारात वयस्कर महिलांना हेरून त्यांना फसवून, हातचलाखी करून त्यांचे अंगावरील दागिने चोरणारे दोन चोरटे ताब्यात त्यांचा आणखिन एक साथीदार निष्पन्न
२३ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिन्यासह एकूण १,७१,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
दिनांक १७/१०/२०२६ रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास लक्ष्मीबाई गणपती निऊंगरे वय ७० वर्षे रा. अळगुंडी, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर ह्या उत्तूर येथील आठवडा बाजारातून परत जात असताना त्यांना एका अनोळखी महिलेने बोलावून घेतले असता सदर ठिकाणी दोन मुले येवून त्यापैकी एकाने सदर अनोळखी महिलेच्या हातातील पुतळ्या पाहून, आपण सोनार असून सदरच्या पुतळ्या खऱ्या सोन्याच्या असून त्याची किंमत १५ लाख रूपये असल्याचे सांगून ते तेथून निघून गेले. त्यानंतर सदर अनोळखी महिलेने पुतळ्या खऱ्या असल्याचे सांगून पुतळ्या एका कापडात बांधून लक्ष्मीबाई निऊंगरे यांच्या हातात देवून त्याबदल्यात त्यांच्या अंगावरील सोन्याची बोरमाळ, कानातील कर्णफुले, कानातील पट्ट्या असे फसवून काढून घेवून सदरची अनोळखी महिला तेथून निघून गेलेबाबत आजरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २४३/२०२६ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे दिनांक ०२/११/२०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक, नीलोत्पल भा.पो.से. यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या.

.पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक .सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे नेतृत्वाखाली पथक तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकांनी सदर गुन्ह्याचे ठिकाणी भेट देवून फिर्यादी यांचेकडून घटनेची माहिती घेवून, घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी केली. सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना पोलीस अंमलदार समीर कांबळे, राजू कोरे, रोहीत मर्दाने यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे कागल गावचे हद्दीतील कागल ते मुरगूड जाणारे रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार आहे. मिळाले बातमीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाने आज दिनांक ०३/११/२०२६ रोजी उजळाईवाडी, ता. करवीर गावचे हद्दीतील सर्व्हिस रोडवर जावून सापळा लावून आरोपी नामे १)विजय यंकाप्पा गोंधळी व.व.२५, २)राकेश यंकाप्पा गोंधळी व.व.३३, दोघे रा. ताहसिलदार प्लॉट, निपाणी, ता.निपाणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवून कायदेशीर प्रक्रीया करून त्यांचेकडून सोन्याची बोरमाळ एक , सोन्याची दोन कर्णफुले, सोन्याच्या दोन पट्ट्या असे एकूण २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची एसपी १२५ डीसी मॉडेलची मोटारसायकल नं. एम.एच.०९ जीएस ११२१ असा एकूण १,७१,५००/- रूपये /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे केले चौकशीत, त्यांनी त्यांची आई संगिता यंकाप्पा गोंधळी अशींनी मिळून सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली आहे. जप्त मुद्देमालासह आरोपींना आजरा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक,.नीलोत्पल भा.पो.से., मा.अपर पोलीस अधीक्षक, आण्णासाहेब जाधव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग श्री. विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संदीप गायकवाड, योगेश गोसावी, युवराज पाटील,शुभम संकपाळ, सतिश जंगम, समीर कांबळे, राजू कोरे, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, संजय हुंबे, सतिश सुर्यवंशी, अमित मर्दाने, सुदर्शन कांबळे यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.