मुंबईत मोफत घरे देई प्रर्यंत, दरमहा घरांचे भाडे द्या . काॅ. अतूल दिघे.
आजरा.- प्रतिनिधी
मुंबईत गिरणी कामगारांना मोफत घरे मिळाली पाहिजे, या मागणीसाठी गेली एकवीस वर्षे सातत्याने संघटना पाठपुरावा करत असल्याने, पंद्रा हजार गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळाली आहेत. म्हाडा कडे नोंदणी केलेल्या सर्व गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरे देई प्रर्यंत, दरमहा गिरणी कामगारांना घरांच्या भाड्या पोटी, किमान विस हजार द्यावेत. अशी मागणी आजरा येथील किसान भवनात आयोजित केलेल्या, गिरणी कामगार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना काॅ. अतूल दिघे यांनी व्यक्त केली.
स्वागत नारायण भडांगे यांनी केले. यावेळी काॅ. दिघे यांनी राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, नवीन ऊस लागन थांबल्याने, दुध उत्पादनात घट होवून, शेती मशागतीसाठी उपलब्ध असणारे ट्रॅक्टर मालकासह शेतकरी अडचणीत येणार आहेत. या वर्षी शेतकऱ्यांना एकरी साठ हजार ची मदत द्या . पिक कर्जे माफ करा. पेन्शन मध्ये वाढ करा व गिरणी कामगारांना दरमहा वीस हजार घरभाडे द्या. तसेच विद्यार्थीना मोफत बससेवा व परीक्षा शुल्क माफ करावे. या मागण्यासाठी ५ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी, सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षांचे जिल्हा अध्यक्ष व आजरा तालूका गिरणी कामगार संघटना अध्यक्ष काॅ. शांताराम पाटील यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी शासन पातळीवर संघटित प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून, गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबई हक्कांचे घर मिळवून देण्यासाठी, शेवट पर्यंत लढा दिला जात असल्याने. आपण सर्वांनी शेतकरी व विद्यार्थी हक्कांसाठी एकजूट रहाण्याचे सांगून, प्रत्येक गावात भेटी देवून फाॅर्म भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला महादेव होडगे, निवृत्ती मिसाळे, नारायण राणे, गोपाळ रेडेकर, हिंदूराव कांबळे, मनपा बोलके,रघूनाथ कातकर, बाबूराव केसरकर, तानाजी गडकरी , मारूती मुरूकटे, धोंडिबा गुरव, जे के सावंत, राजश्री कुंभार, अनिता बागवे,सुशाबाई तुपट यांच्या सह गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते आभार काॅ. संजय घाटगे यांनी मानले.




