HomeUncategorizedआजरा टोल नाक्यावर तालुक्यातील नागरिकांना टोल मोफत.

आजरा टोल नाक्यावर तालुक्यातील नागरिकांना टोल मोफत.

आजरा टोल नाक्यावर तालुक्यातील नागरिकांना टोल मोफत.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील नागरिकांना टोल मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. चारचाकी प्रायव्हेट MH 09 पासिंग असणाऱ्या वाहनांना व MH 09( नसेल तर गावातील गाडी असल्याचा सरपंच दाखला) गाड्यांसाठी आधारकार्ड,फास्ट टॅग व आरसी बुक ची झेरॉक्स द्यावा. लागेल

🟣यामध्ये कारखाना ऊस वाहनांना टोल मोफत

ऊस हंगाम कालावधीत ऊस वाहनांना टोल मोफत करण्याचा निर्णय झाला. संबंधित वाहनांची यादी कारखाना प्रशासनाने देणे आवश्यक.

💥 व्यावसायिक वाहनांना पास

पिवळी नंबर प्लेट असणारी व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलतीचा महिन्याचा पास देण्यात येणार आहे.

💥सोबत प्रलंबित कामे आठवडाभरात पूर्ण करणार यातील मागण्या
पंचायत समिती पासून पाणी गटारीत न जाता रस्त्यावरुन वाहते, पथदिवे व पश्चिम भागातील प्रलंबित कामे आठवडाभरात पूर्ण करणार आहे.
याबाबत १५ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामांची पूर्ततेचा आढावा घेवून टोल सुरु करु द्यायचा की नाही. हे ठरणार आहे. टोल नाक्यावरील अंतर्गत कामे करण्याची मुभा देण्यात आली.
तहसिलदार समीर माने यांच्या प्रमुख बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीला संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व टोल मुक्ती संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.