HomeUncategorizedवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे सभासद व टनेज साखर वाटपास ३१ मे...

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे सभासद व टनेज साखर वाटपास ३१ मे अखेर मुदतवाढ.- चेअरमन मुकुंदराव देसाई.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे सभासद व टनेज साखर वाटपास ३१ मे अखेर मुदतवाढ.- चेअरमन मुकुंदराव देसाई.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत कारखान्याकडे रू.१५०००/- ,रू. १००००/- व रू.७०००/- शेअर्स रक्कम जमा असलेल्या मंजूर सभासदांना अनुक्रमे ५० किलो, २५ किलो व १५ किलो त्याचबरोबर गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिटन अर्धा किलो सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू आहे.कारखाना व्यवस्थापनाने सदर साखर वाटपाची दिनांक १५ मे अखेर असलेली मुदत वाढवून ती दि. ३१ मे २०२६ करणेत आलेली आहे.
कृपया सभासदांनी याची नोंद घेवून आपली साखर ३१ मे २०२६ पूर्वी उचल करावी. त्याचप्रमाणें अपूरी शेअर्स रक्कम असलेल्या सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रु. ७०००/-, रु. १००००/- अथवा पूर्ण शेअर्स रक्कम रू. १५०००/- संबंधित शेती सेंटर आॅफीस अगर कारखाना कार्यस्थळावर भरून तालुका संघाच्या संबंधित शाखेतून साखर उचल करावी असे आवाहन अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले.

चौकट.

सभासद व ऊस पुरवठादारांनी आपली साखर उचल करताना आधार कार्ड झेराॅक्स जमा करणे बंधनकारक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.