आण्णासाहेब पाटील” आर्थिक मागास विकास महामंडळ व “सारथी” या संस्थाना मदत करावी.- आखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुका मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासले नागरिकांची प्रगती होण्यासाठी
आण्णासाहेब पाटील” आर्थिक मागास विकास महामंडळ व “सारथी” या संस्थांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सुरू करुन त्याचे फायदे मिळण्यास सुरु झाली होती. पण आपल्याच कारकिर्दीमध्ये सदरच्या दोन्ही संस्था बंद पाडण्याचे काम व्यवस्थीतपणे सुरु आहे. याचा मराठा समाजाला खेद वाटत आहे त्याच बरोबरीने आपल्याबाबत समाज्यामध्ये रोष निर्माण होत आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कोल्हापूर जिल्हयामध्ये आजअखेर छोटे मोठे उद्योग सुरु केलेल्यांची संख्या २३४२४ इतकी असून सदर व्यावसायिकांना को. ऑप बँकानी २१९२ कोटीपर्यंत कर्ज आदा केले आहे सदर कर्जावरी १२% प्रमाणे होणारा व्याजाचा परतावा गेली आठ महिने महामंडळाकडून मिळालेला नाही. कोल्हापूर जिल्हयासाठी व्याज परताव्यासाठी रु. ३०० कोटींची रक्कम तातडीने मिळणे आवश्यक असनांना या महामंडळाचे सचिव देशमुख हे अडेलतट्टू भूमीका घेवून आकास बुध्दीने काम करीत आहेत. याचा वेळीच बंदोबस्त करुन कोल्हापूर जिल्हयाला रु. ३०० कोटीची तरतूद तातडीने करावी.
तसेचा “बार्टी” महात्मा जोतीबा फूले महामंडळ सारख्या व इतर महामंडळाप्रमाणे “सारथी” या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शैक्षणिक विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना मागील वर्षापर्यंत सुरु होती. पण ही योजना अचानक का? बंद केली याचे कारण समजलेले नाही. ही योजना तातडीने सुरु करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा वसतीगृह भत्ता, पी. एच. डी करणाऱ्या मुलांना गेली सहा ते सात महिने भत्ता मिळालेला नाही., परदेशामध्ये व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांची शिष्यवृत्ती थांबलेली आहे.
“सारथी” या संस्थेच्या कोल्हापूर विभागासाठी रु. ४०० कोटींची तरतूद तातडीने करावी.
वरील दोन्ही संस्थांना मिळून रु. ७०० कोटींची तरतूद ताबडतोब करावी अन्यथा आम्हाला वेगवेगळया प्रकारची धरणे आंदोलन, रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण नंतर प्राणांतिक उपोषण या सारखी आंदोलने करणे भाग पडेल याची दक्षता घेवून वरील दोन्ही महामंडळे सुरळीत चालतील याची खबरदारी घेणे बाबत अखिल भारतीय मराठा महासंघ आजरा तालुक्याच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, ता. अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, चंद्रकांत देसाई, शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे, संभाजी इंजल, सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
