Home Uncategorized घर मालकाच्या निष्काळजीपणामुळे भिंत कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू एक जखमी – प्रकरणी...

घर मालकाच्या निष्काळजीपणामुळे भिंत कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू एक जखमी – प्रकरणी .-घर मालकावर गुन्हा दाखल करा.- भोसले कुटुंबाची मागणी.

घर मालकाच्या निष्काळजीपणामुळे भिंत कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू एक जखमी प्रकरणी .-
घर मालकावर गुन्हा दाखल करा.- भोसले कुटुंबाची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे जुन्या घराची भिंत पडताना दि. २० रोजी दोन व्यक्तींचा मृत्यू व एक जखमी अशी घटना घडली होती. या घटनेला अनुसरून जखमी असलेल्या भोसले कुटुंबाच्या वतीने आजरा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
घर मालकाच्या निष्काळजीपणामुळे भिंत कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू प्रकरणी घर मालकावर गुन्हा दाखल करा. बाबत
अर्जदार तुकाराम बाबुराव भोसले, रा. नाईक गल्ली यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
FIR 75/2026 घर मालकास आरोपी करणेबाबत पोलीस ठाण्यामध्ये FRI क्र. 75/2026 दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये घराची भिंत पाडण्याचे काम चालू असताना निष्काळजीपणामुळे दोन व्यक्तींचा हकनाक बळी जावून त्यांचा मृत्यू झाला असून इतर एक व्यक्ती जखमी आहे. सदर घटनेमध्ये भिंत पाडायचे काम हे संबंधित घर मालक यांचे सांगणेवरून सुरू होते. सदर घर मालक सुशिक्षित असून त्यांच्या या कृत्यामुळे एखादी जीवित हानी घडू शकते ही जाणीव असून देखील भिंत पाडत असताना कोणत्याही प्रकारची योग्य ती उपाय योजना न कराता अथवा सदर बांधकाम पडत असताना योग्य ती खबरदारी तसेच शासकीय कार्यालयातून कोणतीही पूर्व परवानगी न घेता सदर ची बाब घडली आहे. व तसे घर मालकाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नव्हती. सार्वजनिक रस्त्यावरून लॉकांची रहदारी व वर्दळ असताना सदर धोकादायक काम सुरू ठेवले होते. घटना घडलेल्या ठिकाणी खबरदारी म्हणून रस्त्यावर सुरक्षा किंवा अडथळा अगर सुचना फलक असे कांही लावलेले नव्हते. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडून दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला आहे. यामध्ये संबंधित घरमालक डॉ. अनिल देशपांडे यांचा स्पष्टपणे निष्काळजीपणा असलेचे दिसून येते. म्हणून आपणास विनंती आहे की, सदर प्रकरणी घरमालक डॉ. श्री.‌ देशपांडे यांचेवर आरोपपत्र दाखल करून गुन्ह्यातील आरोपी करावे व योग्य ते शासन व्हावे. याबाबत
अधिक तपास करून संबंधित घरमालक डॉ.श्री. देशपांडे यांचेवर गुन्हा नोंद करून अटक करावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.