Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभिंत पडून दोन मृत्यु झाल्याच्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी. ( उ.बा.ठा सेनेची...

भिंत पडून दोन मृत्यु झाल्याच्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी. ( उ.बा.ठा सेनेची मागणी)🟣तीन हजार वरील शेअर रक्कम असलेल्या सभासदांना साखर द्या.- अन्यथा आंदोलन.- भारतीय कम्युनिस्ट पार्टी आजरा🟣आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी हेब्बाळकर तर व्हा. चेअरमन पदी तांबेकर

🟣भिंत पडून दोन मृत्यु झाल्याच्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी. ( उ.बा.ठा सेनेची मागणी)
🟣तीन हजार वरील शेअर रक्कम असलेल्या सभासदांना साखर द्या.- अन्यथा आंदोलन.- भारतीय कम्युनिस्ट पार्टी आजरा
🟣आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी हेब्बाळकर तर व्हा. चेअरमन पदी तांबेकर

💥भिंत पडून दोन मृत्यु झाल्याच्या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी. ( उ.बा.ठा सेनेची मागणी)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शिवसेना (उ.बा.ठा.) सेनेच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहरामध्ये दि. २०/०४/२०२६ रोजी जुन्या इमारतीची भिंत पाडत असताना अपघात होऊन त्यामध्ये एक प्राध्यापिका व एक शाळकरी विद्यार्थिनी मयत झाली. तसेच एक महिला गंभीर जखमी झाली, तरी सदर इमारत पाडणेपुर्वी नगरपंचायत ची रितसर परवानगी घेतली होती. का? सदर इमारत पाडत असताना कॉन्ट्रॅक्टरने योग्य ती काळजी घेतली होती. का ? दोन निष्पाप नागरीकांचा यामध्ये बळी गेला आहे. सदर इमारतीची योग्य ती दक्षता नगरपंचायतने घेतली होती का? याची सखोली चौकशी करणेत यावी. तसेच दोषी लोकांच्यावर व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणेत यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख समीर चाँद, सागर नाईक, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, उप. ता. प्रमुख संजय येसादे, सह अमित गुरव पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सह्या आहेत
.

🟣तीन हजार वरील शेअर रक्कम असलेल्या सभासदांना साखर द्या.- अन्यथा आंदोलन.- भारतीय कम्युनिस्ट पार्टी आजरा

आजरा.- प्रतिनिधी.

तीन हजार रु शेअर्स असलेल्या कारखाना सभासदांना साखर वाटप करणे बाबत. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या २०-३० वर्षा पासून कारखाना उभारणी करीता स्थानिक शेतकरी वगनि कर्ज काढून आपल्या कारखान्याचा शेअर्स घेतला आहे. सर्व सामान्य सभासद शेतकऱ्याना परवडेल असा शेअर्स रक्कम असताना दोन हजार दोनशे वरून, तीन, पाच, दहा, पंधरा हजार रक्कम करून, मुळ सभासदाच्यावर आपण अन्याय करत आहात. तरी तीन व पाच हजार शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदाना साखर वाटप करावी. तसेच सवलतीच्या दरात साखर ही वाटप करत असताना इतर साखर कारखान्या प्रमाणे दर असावा. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याकडून तीन व पाच हजार घेऊन सुध्दा सभासद केलेले नाही. त्या सर्व सभासदाना आपल्या कारखान्यात सभासद करावे अन्यथा त्या अनामत रक्कमा परत कराव्यात, या संर्दभात योग्य ती कार्यवाही व्हावी. अन्यथा संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. या निवेदनावर कॉम्रेड शांताराम पाटील, नारायण भडांगे, काशिनाथ मोरे, महादेव होडके हिंदुराव कांबळे, मन्नाप्पा बोलके सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

🟣आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी हेब्बाळकर तर व्हा. चेअरमन पदी तांबेकर

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सुजय कुमार होते.
चेअरमन पदी महादेव ज्योतिबा हेब्बाळकर यांचे नाव माजी चेअरमन महादेव दत्तात्रय पाटील यांनी सुचवले त्यास अनुमोदन विठ्ठलराव रामराव देसाई यांनी दिले व्हा. चेअरमन पदासाठी संभाजी मारुती तांबेकर यांचे नाव दौलती अंतू पाटील यांनी सुचवले त्याला मधुकर कृष्णा देसाई यांनी अनुमोदन दिले निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर शुभेच्छा पर महादेव पाटील अल्बर्ट डिसूजा डी ए पाटील, एम के देसाई तसेच संघाचे प्रमुख सुधीर देसाई यांनी आपली शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर नूतन चेअरमन महादेव हेंबाळकर व्हा. चेअरमन संभाजी पाटील यांनी दिले स्वर्गीय राजारामबापू देसाई यांनी हा संघ जोपासला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचा कारभार करणार असल्याची ग्वाही नूतन चेअरमन वाईट चेअरमन यांनी दिली आभार गणपतराव सांगले यांनी मांडले. चेअरमन निवडी प्रसंगी ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई राजाराम पाटील राजलक्ष्मी देसाई मायादेवी पाटील उदयराज पवार मधुकर यलगार ज्ञानदेव पवार सुनील देसाई रवींद्र होडगे ज्योतिबा चाळके संजय उत्तरकर गणपती कांबळे महेश पाटील भाऊसाहेब किल्लेदार आधी सर्व संचालक हजर होते निवडीनंतर सहाय्यक निबंधक यांचा सत्कार महादेव पाटील यांनी केला नूतन चेअरमन. महादेव हेंबाळकर यांचा सत्कार सुधीर भाऊ देसाई व्हाईस चेअरमन संभाजी तांबेकर यांचा सत्कार एम के देसाई यांनी केला व शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.