Home Uncategorized भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश?...

भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? पोलीसांनी ७४ जणांवर केला गुन्हा दाखल.🟣आजऱ्यात बेकायदेशीर जाहिरात – डिजिटल फलकावर वन विभागाची कारवाई.- फलक हटाव मोहीम.

🛑भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? पोलीसांनी ७४ जणांवर केला गुन्हा दाखल.
🟣आजऱ्यात बेकायदेशीर जाहिरात – डिजिटल फलकावर वन विभागाची कारवाई.- फलक हटाव मोहीम.

🛑भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? पोलीसांनी ७४ जणांवर केला गुन्हा दाखल.

नाशिकः- प्रतिनिधी.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागलं आहे. पीडित महिलांचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला असून ७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता हे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतंय? या दिशेने पोलीसांचा तपास सुरू झाला असून यामागे पोलीसांना एक वेगळाच संशय आहे.

नाशिकमधील अशोक खरातच्या काळ्या कृत्यांनी समाज हादरलेला असताना आता पीडित महिलांच्याच सन्मानावर दुसरा घाव घातला जातोय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ इतके वेगाने पसरत आहेत की काही तासांत हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ७४ जणांवर आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये व्हॉट्सअँप ग्रुप अँडमिनपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट धारकांचाही समावेश आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडीओ नेमके कुठून येत आहेत आणि कोण व्हायरल करतंय ? याचा तपास अद्याप
सुरू असून पोलिसांना संशय आहे की खरातचेच काही जुने निकटवर्तीय किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांनी हा खेळ सुरू केला असावा. AI आणि मॉर्फिगचा वापर करून बनावट व्हिडीओ तयार केले जात असल्याचंही समोर आलंय, हे व्हिडीओ इतके वास्तव वाटतात की सामान्य नागरिक सहज फसतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने व्हिडीओ बनवणारा आणि फॉरवर्ड करणारा दोघेही गुन्हेगार ठरतात. सायबर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जर तुमच्या मोबाईलवर असे व्हिडीओ आले तर ते लगेच डिलीट करा आणि संबंधित प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा. एका गुन्ह्याची चौकशी सुरू असताना पीडितांच्या सन्मानाशी खेळणं हा आणखी मोठा गुन्हा ठरतो म्हणूनच जागरूक नागरिक म्हणून जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, अशी माहिती सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत यांनी दिली आहे.

🟣आजऱ्यात बेकायदेशीर जाहिरात – डिजिटल फलकावर वन विभागाची कारवाई.- फलक हटाव मोहीम.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील वनविभाग हद्दीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांवर बेकायदेशीरपणे खिळे मारून व वृक्षावर लटकवलेले विविध प्रो. प्रा. यांचे नागरिकांच्या पर्यंत मोफत जाहिरात प्रसिद्ध करण्यावर आता बंदी येऊन पुन्हा प्रसिद्ध फलक लावण्यात आल्यात कारवाई होणार असल्याचे समजते. दि. २८ रोजी वनविभागाच्या कर्मचारी यांनी असे लावलेले सर्व फलक काढून टाकले आहेत. यापुढे असे वृक्षावर फलक लावण्या यांच्यावर कारवाई होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.