Homeकोंकण - ठाणेअल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याने अपघात; एक ठार, दोघे जखमी.

अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याने अपघात; एक ठार, दोघे जखमी.

अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याने अपघात; एक ठार, दोघे जखमी.

आजरा :- प्रतिनिधी

गवसे (ता. आजरा) येथे वनविभागाच्या क्षेत्रात भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अल्पवयीन चालकाचा मृत्यू झाला असून, कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताचे नाव समर्थ पांडुरंग पांगम (वय १७, रा. पारपोलकर कॉलनी, आजरा) असे आहे. तर जखमींमध्ये प्रथमेश व संस्कार (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास समर्थ पांगम याने परवाना नसताना लाल रंगाची होंडा सिटी कार (क्र. MH-01-AV-8372) आंबोलीकडून आजऱ्याच्या दिशेने चालवली होती. गवसे गावापासून २ कि.मी. अंतरावर वनविभागाच्या क्षेत्रात आल्यावर अचानक कारवरील ताबा सुटून कार भरधाव वेगाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात समर्थ याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील दोघे जखमी झाले.

समर्थ हा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नाही, हे माहित असतानाही कार मालक पृथ्वीराज मानसिंग पाटील (वय २४, रा. आजरा)* याने त्याला चारचाकी गाडी चालवण्यास दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत दुंडाप्पा बसवाणी वाजंत्री (वय ४८, व्यवसाय – चिरमुरी व्यापारी, रा. गांधीनगर, आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हे.कॉ. १५३३ सरबळे करीत आहे
त.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.