Homeकोंकण - ठाणेकाजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३ लाख रूपये नुकसान भरपाई पोटी मदत द्या....

काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३ लाख रूपये नुकसान भरपाई पोटी मदत द्या. – शेतकरी संघटना.

काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३ लाख रूपये नुकसान भरपाई पोटी मदत द्या. – शेतकरी संघटना.

आजरा.- प्रतिनिधी.

काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३ लाख रूपये नुकसान भरपाई पोटी मदत द्या. याबाबत शेतकरी संघटनेने गडहिंग्लज उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
चालू हंगामामध्ये चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे हवामानातील अनिश्चिततेमुळे काजू उत्पादनात प्रचंड घट झाली असून, शेतकऱ्यांचे ९०% पर्यंत नुकसान झाले आहे.

सततचे बदलणारे हवामान आणि अवकाळी पावसामुळे तयार काजू बियांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे बी काळवंडली असून त्याचा दर्जा खालावला आहे. बागांची साफसफाई, खते, औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च वाढला आहे. उत्पादन कमी असल्याने हा लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

चंदगड तालुक्यात ८५०० हेक्टर आजरा तालुक्यात 5000 हेक्टर गडहिंग्लज तालुक्यात १८०० हेक्टर क्षेत्रावर काजु लागवड आहे
यामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आणि आर्थिक अशा दुहेरी संकटात सापडला आहे. तरी तीनही तालुक्यातील सर्व काजू बागांचे तातडीने पंचनामे करून काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३.०० लाख रूपये नुकसानभरपाई मिळणेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावे हि विनंती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर राजेंद्र गड्डेनवार, तानाजी देसाई, सताराम केसरकर, संभाजी भोसले, प्रकाश कुंभार, शिवाजी पाटील, रियाज मकानदार, हसन अंकली सह पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.