Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा पंचायत समितीवर महिलाराज.- सभापती जयश्री गाडे तर उपसभापती यशोदा पोवार यांची...

आजरा पंचायत समितीवर महिलाराज.- सभापती जयश्री गाडे तर उपसभापती यशोदा पोवार यांची बिनविरोध निवड.

आजरा पंचायत समितीवर महिलाराज.- सभापती जयश्री गाडे तर उपसभापती यशोदा पोवार यांची बिनविरोध निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड दि. १० रोजी पंचायत समिती सभागृहात तहसीलदार समीर माने यांच्या व गटविकास अधिकारी सुभाष देसाई सहाय्यक गटविकास अधिकारी श्री शेटे गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत चार सदस्य असलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदी सदस्यांनी बोट वर करून मतदान केले यावेळी सभापती व उपसभापती पदासाठी एक – एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. स्वागत व प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री देसाई यांनी केले.
यावेळी बोलताना उत्तुर जि. प. शिरीष देसाई म्हणाले शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता सभागृहातील लोकप्रतिनिधी यांच्यावरती आली आहे. नूतन सर्व पदाधिकारी व सदस्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे व राजकारण विरहित सभागृहात काम करून जनतेची सेवा करावी. मागील चार वर्षापासून पंचायत समितीवर प्रशासक असल्यामुळे कामकाजावर मर्यादा होत्या त्या मर्यादा आता तोडून सर्वांना काम करावे लागेल. या आजरा तालुक्यातील आम्ही दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आपल्याला मदत करू असे श्री देसाई म्हणाले
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई म्हणाले सर्व सदस्यांनी अजरा तालुक्याच्या विकासासाठी चांगले काम करावे. महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करावे जस्तांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच महिला बचत गट कोल्हापूर जिल्हा बँक आपल्याला सहकार्य करेल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावे. असे श्री देसाई म्हणाले
गटविकास अधिकारी श्री सावंत यांनी नूतन पदाधिकारी यांचे स्वागत केले पंचायत समितीमध्ये चार पंचायत समिती सदस्य असले तरी सर्व सदस्य अनुभवी आहेत. आपल्या तालुक्यातील विकास कामासाठी आम्ही सर्व अधिकारी आपल्याला मदत करू यापुढील सभागृह जनतेच्या विकासासाठी काम करीत असे गट विकास अधिकारी श्री. सावंत म्हणाले


कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई म्हणाले मागील चार वर्षांपासून पंचायत समितीला सदस्य नसल्यामुळे अडचणी येत होत्या त्या आत्ता येणार नाहीत. जनतेचा विश्वास सार्थ ठरेल सर्व सदस्यांनी आजरा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे असे गटविकास अधिकारी श्री. सावंत बोलताना म्हणाले
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले आजरा पंचायत समिती मध्ये विकास कामाला गती यावी व सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. आपल्या सोबत आहोत परंतु आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर आम्ही आंदोलन म्हणून आवाज देखील उठवायला कमी पडणार नाही. आपल्या चांगल्या कामाला शुभेच्छा असतील पण विरोधी कामाला विरोध असेल शिंत्रे म्हणाले.
यावेळी अल्बर्ट डिसोजा, संभाजी तांबेकर , कॉम्रेड संपत देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोंथे, समीर पारदे सभापती उपसभापती यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आजरा कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, कारखाना संचालक दीपक देसाई, मारुती घोरपडे, अशोक तरडेकर, माजी सभापती रचना होलम, दिगंबर देसाई, गोविंद पाटील, शिवाजी नांदवडेकर, डी. ए. पाटील, सौ. फर्नांडिस, सरपंच बापू निऊगरे, संजय गाडे, मनीषा देसाई, शिवाजी नांदवडेकर, डी. ए. पाटील, माजी उपसभापती कामिना पाटील, संजय गाडे, संजय येजरे, राजू होलम, वसंत कोंडुसकर, यांच्यासह विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.