लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून अनपेक्षित भेट..पहा तर
मुंबई:- प्रतिनिधी.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याने या दोन्ही महिन्याच्या हप्त्याची पात्र महिला वाट पाहत होत्या. दरम्यान, राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे पैसे खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारने कोणतीही माहिती न देता थेट खात्यात पैसे जमा केल्याने पात्र महिलांना ही अनपेक्षित भेट वाटत आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरता राज्य सरकारने केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसी करण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. तरीही या तांत्रिक अडचणी संपलेल्या नाहीत. मात्र, अशाही परिस्थिती ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात फक्त उरलेला डिसेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात देण्यात आला. त्यामुळे जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. आता फेब्रुवारी महिना संपत आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. दरम्यान, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी जानेवारी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
