Homeकोंकण - ठाणेमहाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गैरहजर.- महाविकास...

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गैरहजर.- महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा.- अधिक पहा.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गैरहजर; महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा.

मुंबईः- प्रतिनिधी.

विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यसोबत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित नव्हते.

पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित का नाही? असा प्रश्न केला असता ते येत आहेत, उत्तर देण्यात आले. मात्र, भास्कर जाधव यांनी आपले मुद्दे मांडले. सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. जाधव यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. दरम्यान, या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आले नव्हते. भास्कर जाधव म्हणाले की, मी स्वतः जयंत पाटील यांना फोन करून सांगितले होते. त्यांनी सांगितले की ते येऊ शकत नाही. मात्र, ते शिशिकांत शिंदे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांना सांगितील. आम्ही देखील त्यांना फोन केला. आता देखील सुप्रियाताईंनी फोन केला होता की, त्यांच्याकडून थोडा उशीर झाला. तरी देकील आम्ही आमचा माणूस पाठवतोय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारच्या चहापाण्यावर आम्ही बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांचा अपघात आहे की घातपात याबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वगळून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळावी, असे नेत्यांकडून सांगण्यात आले. तर, विधान परिषदेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर राज्यसभेची काँग्रेसला असे मुद्दे काँग्रेस नेत्यांकडून मांडण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या चर्चेपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवल्याने देखील महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.