🟣उत्तुर जि. प. – उमेदवार विठ्ठल उत्तुरकर – सह शिवसेनेचे उमेदवार – पालकमंत्री ना. आबिटकर यांच्या सभेमुळे प्रचारात आघाडीवर
🛑घरची भाकरी खाऊन.- कार्यकर्ते पोहोचवत आहेत. उत्तुर पंचायत समितीमध्ये मशाल घेऊन घरोघरी
🟣उत्तुर जि. प. – उमेदवार विठ्ठल उत्तुरकर – सह शिवसेनेचे उमेदवार – पालकमंत्री ना. आबिटकर यांच्या सभेमुळे प्रचारात आघाडीवर
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शेवटचे प्रचाराचे दोन दिवस शिल्लक असताना दि. ३ रोजी पेरणोली जि. प. उत्तुर जि. प. व चार पं. स. जोरदार प्रचार सभा झाल्या.

उत्तुर जिल्हा परिषद मध्ये तिन्ही उमेदवार एकास एक असताना जिल्हा परिषदेचे उमेदवार विठ्ठल उत्तुरकर यांनी प्रचारात आघाडी घेत यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यासह तालुक्याचा विकास व चांगल्या माणसासोबत राहणं आपलं कर्तव्य असल्याचे. व विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात पाठपुरावा करणार यापुढे संपूर्ण तालुक्यात पालकमंत्री या नात्याने लक्ष देणार आहे. यामुळे आपण या विभागातील जिल्हा परिषदेचे उमेदवार विठ्ठल उत्तुरकर सह सर्व उमेदवारांचे धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून विजय करावे असे आवाहन केले.

या जाहिर सभेमुळे उत्तुर गावासह या मतदारसंघातील गावामध्ये मतदारांची परिवर्तनाची लाटेत परिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याचे बोलले जाते.
या जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेचे यापूर्वी देखील फारस प्रभुत्व नव्हतं. कागल विधानसभेला जोडलेली ही जिल्हा परिषद आहे. पण राष्ट्रवादीचा बाल किल्ला असला तरीही यापूर्वी या जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मागील तीन जिल्हा परिषद मध्ये विजय झाला होता.

सद्यस्थितीत तालुक्यात महायुतीमध्ये बिघाड होऊन तिन्ही पक्षांचे परस्पर विरोधी उमेदवार उभे आहेत.
परंतु या निवडणुकीत निवडून येणारे उमेदवार हे शेवटी महायुतीचे उमेदवार असतील कालचे मित्र आजचे शत्रू, व आजचे मित्र कदाचित उद्याचे शत्रू असू शकतात कोण कोणाच्या व्यासपीठावर कधी असतो कोण कोणाचा झेंडा कधी हाती घेतो. व सकाळी कुठे असतो याचा थाग पत्ताच नाही.
💥ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजपने देखील या जिल्हा परिषदेमध्ये कंबर घसली आहे. व ताकतीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी, व शिवसेनेचा धनुष्यबाण त्यांच्यामध्ये चुरशीची लढत होत असल्याचे चित्र मतदार संघात आहे. पण पालकमंत्री नाम. श्री. आबिटकर यांच्या प्रचार सभेने या मतदारसंघातील उमेदवारांच्या मतपेटीत बदल होतो. का? पाहावे लागेल. काही उमेदवार आपला विजय निश्चित मानत असले तरीही कोणते उमेदवार मतदारापर्यंत पोहोचले व आपली भूमिका पटवून दिली आहे. निकालानंतर स्पष्ट होईल. पण इतरांना कमी लेखणारी काही मंडळी व काहींचा ओहर कॉन्फिडन्स नडणार हे मात्र निश्चित.

🛑घरची भाकरी खाऊन.- कार्यकर्ते पोहोचवत आहेत उत्तुर पंचायत समितीमध्ये मशाल घरोघरी
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील होन्याळी गावचा, व गिरणी कामगारांचा सुपुत्र, कष्ट, संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर घडलेला, शिवधर्म संघटना संस्थापक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच होन्याळी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सागर शशिकांत वाघरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षातून मशाल या चिन्हावर उत्तूर गण पंचायत समिती मधून निवडणुकीसाठी शड्डू मारून मैदानात उतरत मशाल चिन्ह घेऊन घरोघरी पोहोचत आहे. सामान्य परिस्थितीतून उभारी घेत शिक्षणाला आयुष्याचे भांडवल मानत समाजसेवेचा मार्ग स्वीकारलेल्या उमेदवार श्री वाघरे यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रभावी वक्तृत्वशैली, निर्भीड विचारसरणी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची तयारी यामुळे ते आज भागातील तरुणांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
सामान्य कुटुंब व गिरणी कामगारांच्या घरात वाढलेला हा युवक शिक्षणाची कास धरून पदवीधर झाला आणि ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच म्हणून कार्य करताना पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, शेतकरी व कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटत राहिला. “सत्तेपेक्षा सेवा मोठी” हा मंत्र जपत त्यांनी केलेले कार्य होन्याळी व उत्तूर गणासाठी दिशादर्शक ठरले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सांगितले की, “सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, कष्टकऱ्यांच्या लेकरांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि उत्तूर गणातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही उमेदवारी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून मी शिवसेनेकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे.” ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर संघर्षातून घडलेल्या नेतृत्वाच्या विश्वासाची लढाई ठरणार आहे. या पंचायत समिती मतदारसंघात रस्त्यावरच्या लढाया व अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्याला मतदार मतपेटीतून मदत करतात का पाहाव लागेल.. उत्तुर पंचायत समितीचे मशाल चिन्हाचे उमेदवार श्री. वाघरे यांचं या विभागात सामाजिक कार्य आहे. त्यांचे वरिल जिल्हा परिषद मतदान कोणत्या उमेदवाराला होणार. याचा देखील निसटता विजय होऊ शकतो. कारण ही निवडणूक निसटत्या विजय व पराभवची आहे.
🟣सर तुम्ही गुरुजी व्हा.- हे नाटक
आजरा.- प्रतिनिधी.

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या हितेश राजबंशी याचे यश. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या हितेश राजबंशी याला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले.
यावर्षी कोल्हापूर व सांगली केंद्रावर ५ जानेवारी ते १५ जानेवारी यादरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील ५२ बालनाट्य सादर झाली. साधारण ५०० च्यावर विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या वतीने सादर केलेल्या सर तुम्ही गुरुजी व्हा. या नाटकातील गुरुजी या पात्रासाठी कु. हितेश दीपक राजबंशी या विद्यार्थ्यास अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणत्र प्राप्त झाले. या बालनाट्याचे दिग्दर्शन सहाय्यक शिक्षक व्ही ए पोतदार यांनी केले होते तसेच टी एम पाटील सौ एम एस शेलार सौ व्ही एच अडकुरकर, आय के पाटील कु. अभिषेक देशपांडे यांचे सहकार्य लाभले तर शाळेचे मुख्याध्यापक ए एल तोडकर, उपमुख्याध्यापिका सौ एच एस कामत, पर्यवेक्षक ए आर व्हसकोटी यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व स्तरातून सदर विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.


