Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र गिरणी कामगार, धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणार.- पालकमंत्री...

गिरणी कामगार, धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणार.- पालकमंत्री नाम. श्री.आबिटकर ( पेरणोली जि. प. – पं. स. उमेदवारांच्या प्रचारार्थ कोळिंद्रेत जाहीर सभा संपन्न. )

गिरणी कामगार, धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणार.- पालकमंत्री नाम. श्री.आबिटकर
( पेरणोली जि. प. – पं. स. उमेदवारांच्या प्रचारार्थ कोळिंद्रेत जाहीर सभा संपन्न. )

आजरा.- प्रतिनिधी.

पालकमंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना सदैव पाठीशी राहील. पेरणोली जिल्हा परिषद गट व या विभागातील दोन्ही पंचायत समितीला शिवसेनेने दिलेले उमेदवार सातत्याने मतदार संघाचे काम करणारे आहेत. तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कोळिंद्रे येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

माजी सरपंच शंकरराव उगाडे अध्यक्षस्थानी होते.
प्रास्ताविक प्रा. सुरेश बुगडे यांनी केले. यावेळी मंत्री आबिटकर यांनी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गट व चारही पंचायत समिती गणात शिवसेनेने दिलेले उमेदवार सामान्य जनतेशी नाळ असणारे आहेत . केसरकर यांचा गेली ४० वर्षे तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात सहभाग राहीला आहे. तालुक्याच्या विकासासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.आजरा कारखान्याचे योग्य आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार असल्याचे नाम. श्री. आबिटकर म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णूपंत केसरकर म्हणाले, आता पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांचे सारखे नेतृत्व या पूर्व विभागाला देखील आम्ही असून येत्या पाच वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

विरोधी उमेदवार, जिल्हा बँक संचालक व कारखाना संचालक सुधीर देसाई यांच्यावर जोरदार टीका. – यावेळी केसरकर यांनी उठविली. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर जिल्हा परिषदेचा शब्द दिला होता. मात्र निवडणूक जाहीर होताच ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. साखर कारखान्याला एन. सी. डी. सी कडून अर्थसहाय्य मिळाले, यातून के. डी. सी. बँक सुटली पण कारखाना अडचणीत आल्याचे ते म्हणाले . कारखान्यात सर्वच बाबीत त्यांचा हस्तक्षेप असून कारखान्याची सुधीर देसाई यांनी वाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला. पालक मंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून कारखान्याच्या या परिस्थितीला सुधीर देसाई जबाबदार असल्याचे म्हणाले व धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याची आवाहन केले.

बोलताना आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, तालुक्याचे राजकारण सर्वसामान्य माणसांच्या हातात राहीले पाहिजे यासाठीच आपण व आमचे नेते जयवंतराव शिंपी यांनी मंत्री आबिटकर यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
या सभेला माजी. जि. प. सदस्या सौ. सुनिता रेडेकर म्हणाल्या लाडक्या बहिणीला दिलेल्या पंधराशे रुपये ची परतफेड करण्याची वेळ आली आहे. ती धनुष्यबाण चिन्हाला मतदान करून परतफेड करावी असे म्हणाल्या, प्रा. संभाजी सावंत, तानाजी राजाराम, राजाराम पोतणीस, आदित्य रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वाटंगी पंचायत समितीचे उमेदवार सतीश फडके, पेरणोली पंचायत समितीच्या उमेदवार सौ. श्वेता सरदेसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, आजरा ता. संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, आजरा उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे, सौ. आसावरी खेडेकर, इंद्रजीत देसाई, विलास पाटील, अशोक पोवार, माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, पूर्व विभागाचे नेते रमेश रेडेकर, तसेच गोविंद गुरव विश्वास जाधव, लहू पाटील, दयानंद नेऊंगरे, शंकर उगाडे, धनाजी बुगडे, , संतोष भाटले, सुनील दिवेकर, संकेत सावंत, काका देसाई, संतोष पाटील, धनंजय पाटील, काका देसाई, सामाजिक कार्यकर्ते अश्विन डोंगरे, यांच्यासह पेरणोली जिल्हा परिषद गटातील मतदार पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.