🟣इतर मागास प्रवर्गचा ( दर्जी ) दाखला पडताळणी समितीने ठरविला अवैद्य. नगरसेविका रहिमतबी खेडेकर यांच्या दाखल्यावर केली होती तक्रार.
🟣आजरा ता. सरपंच संघटनेचा वार्षिक आढावा बैठक व गुणवंत ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा संपन्न.
🟣इतर मागास प्रवर्गचा ( दर्जी ) दाखला पडताळणी समितीने ठरविला अवैद्य. नगरसेविका रहिमतबी खेडेकर यांच्या दाखल्यावर केली होती तक्रार.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायतीच्या नगरसेविका रहिमतबी सलीम खेडेकर यांचा इतर मागास प्रवर्गचा ( दर्जी ) दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने ठरविला अवैद्य.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेविका होत्या त्या जिल्हा पडताळणी विभागाने अपात्र ठरल्या आहेत. याबाबत निकाल पत्र पडताळणी समितीने कडून प्राप्त झाले आहे. माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांनी केली होती तक्रार.
चौकट.
नगरसेविका रहिमतबी खेडेकर –
सदर दाखवा बाबत मी न्यायालयात दाद मागणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. माझा दाखला समितीन अवैद्य हरविला याबाबत मला न्यायालयात न्याय मिळेल व माझा दाखला वैद्य राहील अशी अपेक्षा आहे.
🟣आजरा ता. सरपंच संघटनेचा वार्षिक आढावा बैठक व गुणवंत ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा संपन्न.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा तालुका सरपंच संघटनेची वार्षिक आढावा बैठक आणि विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत ग्रामपंचायतींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्याचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जयंत सर्जेराव पाटील (कुडेकर) संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेच्या महिला अध्यक्षा सुषमा पाटील (कानोली) या होत्या.
स्वागत ता. अध्यक्ष बापू निंगुडे यांनी केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी सरदेसाई यांनी प्रास्ताविक करताना सरपंच संघटनेच्या कार्याचा आढावा मांडला.
यावेळी सौ. भारती डेळेकर, सरपंच सोहोळे, किरण अमनगी, सरपंच उत्तूर, सौ. माधुरी गाडे सरपंच भादवण या सरपंचांनी मनोगत व्यक्त करताना सरपंचांना येणाऱ्या अडचणी व विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला.
जयंत पाटील यांचे प्रमुख प्रतिपादन.-
प्रमुख पाहुणे श्री.पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात आजरा तालुका सरपंच संघटना ही अत्यंत मजबूत आणि सक्षम संघटना आहे. आजरा तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे. रोपे लावण्याचे काम सुरू असतानाही सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, हे कौतुकास्पद आहे.”
सरपंच परिषदेमुळे सरपंच-उपसरपंच यांना मानधन सुरू झाले, थेट निधी ग्रामपंचायतींना येऊ लागला, आर्थिक व्यवहार सरपंचांच्या सहिने होऊ लागला. तसेच अनेक प्रशासकीय सुधारणा झाल्या. यामुळे सरपंच-उपसरपंचांच्या मान-सन्मानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.पुढे बोलताना त्यांनी मागण्या मांडल्या: सरपंच-उपसरपंच सदस्यांना विमा संरक्षण मिळावे
सरपंचांना पेन्शन लागू व्हावी
- ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत
- स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा
यामध्ये प्रामुख्याने
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी “आजरा तालुका हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करावा” असे आवाहन केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व अन्य पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.
सन 2023-24 ग्रामपंचायत दाभील, खानापूर, मालेवाडी
सन 2024-25 ग्रामपंचायत पेरोली, मुसळे, चिमणे
स्मार्ट सिटी तालुक्यात प्रथम ग्रामपंचायत सरोळी
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार 24-25 प्रथम क्रमांक- ग्रामपंचायत मिरजे (शेतलजी)

यावेळी विशाल मिरजे (शेतलजी) यांनी ‘AI तंत्रज्ञान, पिके आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आजरा तालुक्यातील २४ घटकांना (सिंधू, केरळ) भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करण्यासाठी माहिती देण्यात आली.
यावेळी बंडोपंत चव्हाण, सुनिता रेडेकर, विद्यमान पंचायत समिती सदस्य समीर पारटे, विलास पाटील, शशिकांत कांबळे, लता रेडेकर, लहू वाकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गाडे यांनी केले. आभार सुषमा पाटील यांनी मानले.
