Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.🟣 आजरा हायस्कूलच्या...

आजरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.🟣 आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्री. ए. आर. व्हसकोटी

🟣 आजरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
🟣 आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्री. ए. आर. व्हसकोटी

🟣 आजरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

आजरा, प्रतिनिधी.

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक ए. आर. व्हसकोटी व पर्यवेक्षक एम. एस. गोरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. दीप्ती सावंत हिने लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. तसेच श्रीमती एस. एस. कुराडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकजागृतीच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. व्ही. पी. हरेर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोर समाजसुधारक व राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

🟣 आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्री. ए. आर. व्हसकोटी

आजरा, प्रतिनिधी.

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे मुख्याध्यापकपदी ए. आर. व्हसकोटी सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी पदभार स्वीकारला. यानिमित्त त्यांचा तसेच नवनियुक्त पर्यवेक्षक एम. एस. गोरे सर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना व्हसकोटी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व शाळेच्या गुणवत्तावृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच संस्था अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, सीईओ डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश अण्णा कुरुणकर व संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.