HomeUncategorizedविकासाच्या जोरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित :- विलास नाईक. ( आजरा तालुक्याच्या...

विकासाच्या जोरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित :- विलास नाईक. ( आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात प्रचार दौरा.)🟣सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणुकीसाठी जनता गृहतारण संस्था.

🟣विकासाच्या जोरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित :- विलास नाईक. ( आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात प्रचार दौरा.)
🟣सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणुकीसाठी जनता गृहतारण संस्था.

🟣विकासाच्या जोरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित : विलास नाईक. ( आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात प्रचार दौरा.)

आजरा.- प्रतिनिधी.

गेल्या दहा-बारा वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टी सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केलेला आहे. सर्वच दृष्टीने सर्वसामान्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत आले आहे. आजरा तालुक्याला विकासाभिमुख चेहरा भाजपच्या माध्यमात प्राप्त झाला आहे. यामुळेच भाजपला आजरा तालुक्यात मोठा जनाधार मिळत आहे. त्याचे रूपांतर सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतांमध्ये होणार आहे. यामुळेच आजरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक यांनी व्यक्त केला. ते आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषदे मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये बोलत होते. भाजपा नेते व आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी सर्वच गावातील मतदार बंधू-भगिनींनी भाजपच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार करत कमळाला मतदान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, विजय पाटील, दशरथ अमृते, इंद्रजित देसाई, उत्तम देसाई, दीपक देसाई, लहू वाकर, संभाजी पाटील, दीपक गवळी, पांडुरंग राणे, अनिल नार्वेकर, विठोबा पाटील, अनिकेत दळवी, अनिल केरकर, विश्वास गवळी, सुभाष जोशीलकर यांच्यासह गावातील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात भाजपच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीला दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग असलेल्या पेरणोली, देवकांडगाव, दाभील, गवसे, देवर्डे परिसरात भारतीय जनता पार्टीने प्रचार रॅली राबवली. या प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी घर टू घर प्रचार मोहीम राबविण्यात आली. भागातील विविध नागरिक, युवक, महिला यांच्याशी संवाद देखील साधण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयवंत सुतार व पंचायत समितीचे उमेदवार स्मिता देसाई यांना मोठे मताधिक्य देत निवडून देण्याचा निर्धार पश्चिम भागातील मतदार बंधू-भगिनींनी केला आहे. पश्चिम भागात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

यावेळी उमेदवार जयवंत सुतार, स्मिता देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दीपक गवळी, संभाजी सरदेसाई, विकास बागडी, बळवंत शिंत्रे, सुरेश गिलबिले, उत्तम देसाई, सयाजी नार्वेकर, देविदास गुरव, संदीप देसाई, महादेव निऊंगरे, पांडुरंग पाटील, विश्वास कोडक, विठ्ठल मस्कर, विनायक लोहार, प्रसाद केसरकर, इरफान शेख, राजेंद्र कालेकर, मुकुंद कांबळे, राजू दिक्षित, लहू वाकर, विलास धडाम, प्रकाश कविटकर, उत्तम कासार, अजित हरेर, बबलू शेळके, दिलीप सुतार, हर्षवर्धन महागावकर, अमोल सुतार, पंकज वास्कर, अनिकेत दळवी, रवींद्र दिवेकर यांच्यासह नागरिक प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

🟣सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणुकीसाठी जनता गृहतारण संस्था.

आजरा.- प्रतिनिधी.

सुरक्षित आणि खात्रेशीर गुंतवणुकीसाठी जनता सहकारी गृहतारण संस्था आजरा हा एकमेव पर्याय आहे. कारण संस्थेतून घर बांधणीसाठी दिली जाणारी कर्जे ही तारणाशिवाय आणि मॉर्गेज शिवाय दिली जात नाही त्यामूळे इथल्या ठेवी २००% सुरक्षित आहेत. असे प्रतिपादन प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील यांनी केले. जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महिलांमध्ये बचतीची शिस्त आणि सवय असते. हीच गोष्ट कुटुंबाच्या फायदयाची ठरते. तेव्हा अधिकाधिक महिलांनी जनता गृहतारण संस्थेमध्ये आपली खाती उघडून सहकार्य करावे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संचालिका प्रा. सौ. क्रांती शिवणे होत्या.
जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती करून दिली या मेळाव्यासाठी आजरा नगरपंचायतीच्या नूतन उपनगराध्यक्षा सौ. आश्विनी डोंगरे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी – पाटील, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, सौ. सुनंदा मोरे, सौ. सुप्रिता मोरे, सौ. शुभदा बाचूळकर, सौ. सुश्मिता सादळे, सौ. शितल मोरे, सौ. रंजनाताई कावळे, सौ. गीता नाईक, सौ. भैरवी सावंत व या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.