Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभादवण पं. स. मध्ये उबाठा सेनेची भूमिका गुलदस्त्यात का?( गावात दोन उमेदवार...

भादवण पं. स. मध्ये उबाठा सेनेची भूमिका गुलदस्त्यात का?( गावात दोन उमेदवार आहेत.- पक्षाने स्थानिक पदाधिकारी यांना निर्णय घेण्याची जबाबदारी दिल्यास योग्य निर्णय घेऊ. ता. समन्वय श्री. शिंदे. )

भादवण पं. स. मध्ये उबाठा सेनेची भूमिका गुलदस्त्यात का?
( गावात दोन उमेदवार आहेत.- पक्षाने स्थानिक पदाधिकारी यांना निर्णय घेण्याची जबाबदारी दिल्यास योग्य निर्णय घेऊ. ता. समन्वय श्री. शिंदे. )

आजरा.- प्रतिनिधी.

उत्तुर जिल्हा परिषद मधील भादवण पं. स. मध्ये भादवण गावातील दोन उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत.
यामुळे स्थानिक उबाठा शिवसेना शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिक यांना अद्यापही पक्षाने कोणताही निर्णय न दिल्यामुळे स्थानिक गावातील शिवसैनिक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

यामध्ये तालुका उबाठा सेनेचे ता. प्रमुख युवराज पोवार यांची पत्नी पेरणोली पंचायत समिती मधून राष्ट्रवादीसोबत युती करून टेबल या चिन्हावर लढत आहेत. तर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार यांचे चिन्ह घड्याळ आहे.


पेरणोली जिल्हा परिषद मधील ही युती फक्त या मतदारसघ मर्यादित आहे की संपूर्ण तालुक्यातील चार पंचायत समिती व दोनही जिल्हा परिषद साठी आहे. याबाबतची स्पष्ट भूमिका अभ्यास समजले नाही.यापूर्वी या मतदारसंघात मडिलगे व भादवण या गावातील मतदानावर निकाल अवलंबून असायचा परंतु दोन पंचायत समिती मतदारसंघ कमी केल्याने या मतदारसंघासह अन्य मतदारसंघात देखील गावांची वाढ झाली आहे. मागील अनेक वर्षापासून भादवण पंचायत समिती सदस्य हा मडिलगे गावातील होता.

यावेळी मडिलगे गावात कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने, व या मतदारसंघातून मडिलगे गावाला उमेदवारीसाठी डावल्यामुळे भादवण येथील उमेदवारांना संधी मिळते की या मतदारसंघातील सोहळे गावातील उमेदवार यांना मतदार संधी देतात. याबाबत या मतदारसंघात मतदार तर्कवितर्क लढवत असताना. शिवसेना उबाठा यांनी अद्याप या मतदारसंघातील भूमिका स्पष्ट केली नसल्याचे दिसते. याबाबत भादवण गावातील आजरा ता. समन्वय मुंबई स्वप्निल शिंदे यांना विचारणा केली असता. कोणत्या उमेदवारांसोबत उभे राहावं सहकार्य करावे याबाबत पक्षाने अजून आदेश दिलेला नाही. परंतु याबाबतची भूमिका गावातील दोन उमेदवार असल्यामुळे कोणासोबत राहायचं हा निर्णय घेण्याची जबाबदारी किंवा अधिकार स्थानिक पदाधिकारी, शाखाध्यक्ष, शिवसैनिक यांना दिल्यास आम्ही याबाबत चर्चा करून लवकरच आपल्याला कळवू असे बोलताना श्री शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.