HomeUncategorizedवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा..🛑उचंगी लघु...

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा..🛑उचंगी लघु पाठबंधारे वरील उद्या प्रकल्पग्रस्त काम बंद पाडण्याचा इशारा.. तहसीलदारांना निवेदन.( महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे बंद करावे.. प्रकल्पग्रस्त.)

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा..
🛑उचंगी लघु पाठबंधारे वरील उद्या प्रकल्पग्रस्त काम बंद पाडण्याचा इशारा.. तहसीलदारांना निवेदन.
( महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होयी पर्यंत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे बंद करावे.. प्रकल्पग्रस्त.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर १७८८८० मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि.०१/१२/२०२४ ते १५/१२/२०२४ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन रू.३१००/- प्रमाणे रू.१५ कोटी २३ लाख विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ३० नोव्हेबर २०२४ अखेरची ऊस तोडणी वाहतुक बिलाची रू.२ कोटी ७५ लाख इतकी रक्कम संबंधीत कंत्राटदारांचे खातेवर जमा करणेत आली असून संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी वाहतुक कंत्राटदार यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

हंगाम २०२४/२५ मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा कार्यक्षेत्रात लावुन प्राधान्याने ऊसाची उचल करणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपूर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा करणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

कार्यक्षेत्रात ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. सद्या कार्यक्षेत्रातील हत्ती, गवे इत्यादी जंगली प्राण्यांनी नासधूस केलेल्या ऊसाचे तोडणीस प्राधान्य दिले जात आहे. सदर बाधीत क्षेत्र आटोक्यात येताच ज्या गावात यंत्रणा नाही किंवा अपुरी आहे तेथे प्राधान्याने यंत्रणा लावुन ऊस उचल करीत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर,.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

🛑उचंगी लघु पाठबंधारे वरील उद्या प्रकल्पग्रस्त काम बंद पाडण्याचा इशारा.. तहसीलदारांना निवेदन.
( महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होयी पर्यंत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे बंद करावे.. प्रकल्पग्रस्त.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

उचंगी लघु पाठबंधारे प्रकल्पातील प्रलंबित खालील मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे बंद करावे अन्यथा चालू असलेले काम दि १४ रोजी बंद पाडण्यात येईल याबाबत प्रकल्पग्रस्तांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
उचंगी प्रकल्पामध्ये सन २०२२ ला प्रकल्पग्रस्तांच्या सहभागातून प्रकल्पामध्ये पाणी साठवणेची जवाबदारी प्रशासनावर विश्वास ठेऊन प्रकल्पग्रस्तांनी दिली त्या नंतर सन २०२२ ते २०२४ या कालावधीमध्ये सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा खालील प्रश्न आजही सुटले नाहीत त्यामुळे आंम्ही प्रकल्पग्रस्त खालील मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी दि. १४/०१/२०२५ रोजी पासून प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरु असलेली कामे आम्ही बंद करत आहोत तरी आपण स्वतः लक्ष घालून प्रकल्पग्रस्तांचे खालील प्रश्न सोडवणे साठी संबधित विभागाच्या सर्व अधिकान्यांची आपल्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत हि विनंती सोबत खालील मागणी केल्या आहेत.

चौकट..

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न खालील प्रमाणे…

१. निर्वाह क्षेत्राचा फेर सर्वे करून प्रस्ताव पाठवणे बाबत दि. ०६/०३/२०२४ रोजी मदत व पुनर्वसन मंत्री यांचे अध्यक्षते खाली बैठक झाली होती त्या मध्ये प्रकल्पग्रस्तांचा सर्वे व फेर अहवाल करणे संदर्भात झालेल्या चर्चे बाबत..
२. गायरान जमिनींचा आकार लाऊन मिळणे बाबत्र..
३. जमीन वाटप झालेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींचे स्वतंत्र नकाशे तयार करणे वाबत..
४. जमीन वाटपाचे आदेश झालेल्या धरणग्रस्तांना जमीन मोजून त्यांना कब्जा देणे बाबत..
५. अंशतः बुडीत झालेल्या गट नंबरांची फेर मोजणी करून मिळणे बाबत.. (पांडुरंग केरबा धनुकटेकर)
६) मौजे चाफवडे व जेऊर गावातील धरणाच्या पाण्याखालील बुडीत झालेल्या व होणाऱ्या मंदिरांना जागा उपलब्ध करून मिळणे बाबत..७.) उजव्या तिरावरील चाफवडे ते जेऊर या रस्त्यामध्ये गेलेली झाडे व जमीन यांचा मोबदला मिळणे बाबत..८.) मौजे बोलाकेवाडी येथे जमीन मिळालेल्या खातेदारांना ती जमीन कसणेसाठी फॉरेस्ट जमिनी मधून जावे लागते तरी त्यांना रस्ता करून मिळणे बाबत..९.) भावेवाडी, चितळे व वाटंगी मध्ये जमिनी मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरासाठी भूखंड मिळणे बाबत..१०)स्वेच्छा पुनर्वसनाची वाढीव रक्कम मिळणे बाबत. ११. ) धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनीचे सपाटीकरण करून मिळणे बाबत..१२.) चितळे व भावेवाडी मध्ये वाटप झालेल्या गायरान जमिनीमधील रस्त्या व बाबत..१३ ) धोक्याच्या पातळी मधील घरांचा सर्वे करणे वावत..
१४) जळगाव जिल्हाधिकारी यांनी पानंद रस्ते, शिवार रस्ते व वहिवाटीने पडलेल्या पाय वाटा खुल्या करणेचा निर्णय घेतला आहे त्याच प्रमाणे आजरा तालुक्यातील पानंद रस्ते, शिवार रस्ते व पाय वाटा खुल्या करणे संदर्भात कृती कार्यक्रम तयार करावा त्यामुळे आजरा तालूक्यातील उचंगी, चित्री, सर्फनाला व आंबे ओहोळ या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना शेतीमध्ये वहिवाट करणे सोयीचे होईल. अशा मागण्या आहेत.

वरील सर्व प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने बैठक लावावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सरपंच
धनार्जी दळवी, कॉम्रेड संजय तर्डेकर, तसेच मारुती चव्हाण, प्रकाश भंडारे, कृष्णा गुळकर, निवृत्ती बापट, पांडुरंग धनुकटेकर सह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.