आजरा.- स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने आजऱ्यातील पत्रकारांचा सन्मान.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून व पत्रकार दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने पत्रकारांना भेटवस्तू गुलाब पुष्प देऊन सन्मान केला यावेळी चेअरमन दयानंद भुसारी म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक पत्रकार असल्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकून आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. म्हणून या दिवसाचे अवचित साधून मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या निमित्ताने हा पत्रकारांचा सन्मान आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी संचालक शिवजी येसने यांनी पत्रकारांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. व्हा. चेअरमन सुधीर कुंभार यांनी आभार मानले.
यावेळी संचालक नारायण सावंत, रवींद्र दामले, सुधीर कुंभार, रणजित पाटील, गणपत जाधव, सुधीर चोडणकर, विश्वजित मुंज, राजेद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, सौ. सुनिता कुंभार, सौ. सारीका देसाई, अर्जुन कुंभार- व्यवस्थापक, व कर्मचारी वर्ग. मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी आजरा तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.