🟥 लोकसभेच्या तिकिटासाठी सोडले उपजिल्हाधिकारी पद.- पक्षाने उमेदवारी………..👇
एम.पी. वृत्तसंस्था.
प्रशासकीय सेवेतून राजकारणात प्रवेश करणारे प्रशासकीय अधिकारी राजकारणात मोठ्या पदावर जातात. आमदार, खासदार, मंत्री म्हणून काम करण्याच्या त्यांना राजकीय पक्षाकडून संधी मिळते.मात्र, राजकीय पक्षाने निवडणुकीत तिकीट देण्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन आपल्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पश्चातापाची वेळ आली आहे.
निशा बांगरे या मध्य प्रदेशमध्ये राज्यातील छत्रपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या. कमलनाथ यांनी बांगरे यांना तिकीट देण्याचा शब्द दिला होता. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने तसेच त्यांचा राजीनामा भाजप सरकारने वेळेत स्वीकारला नसल्याने त्यांची संधी हुकली. मात्र, लोकसभेला संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली.
🟥निशा बांगरे यांनी काँग्रेसने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कमलनाथ यांनी मला राजकारणात येण्यात सांगितले. काँग्रसने माझ्याशी संपर्क साधत मला निवडणूक लढण्यासाठी तिकीट देण्याचे आश्वासन दिले. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. संधी मिळत असेल तर नाकारायला नको म्हणून आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी मी काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, बेतुलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना ही सुशिक्षित महिला राजकारणात येते याची भीती वाटल्याने मला तिकीट नाकारण्यात आले.
🛑पुन्हा नोकरी मिळवण्याची धडपड
निशा बांगरे यांना विधानसभेला तिकीट मिळाले नाही. नंतर काँग्रेसने त्यांना प्रवक्ते पदावर नियु्क्त केले. लोकसभेमध्ये त्यांना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेथे ही त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे आपली नोकरी परत मिळवण्यासाठी निशा बांगरे धडपड करत आहेत. एकवेळा स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे सोपे आहे, पण राजकारणात नाही, अशी हतबल भावना निशा व्यक्त करतात.