आजरा तालुक्यातील एका गावात गव्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यात सातत्याने वन्य गव्याचे हल्ले होत आहेत. असाच हल्ला पाळीव प्राणीवर गोठ्यात बांधलेल्या म्हैशीवर गव्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना आज मुरुडे येथे घडली आहे.
मुरुडे ता. आजरा येथील रामचंद्र पाटील यांनी शेतात जनावरांसाठी गोठा बांधला आहे. या गोठ्यात गाभण असलेली म्हैस बांधलेली होती. या गोठ्याजवळ गवा येत त्यांने म्हैशीवर हल्ला केला. म्हैशीच्या मानेच्या खालील बाजूस गव्याचे शिंग घुसवून जखमी केले आहे .वनपाल एस.के.निळकंठ व वनरक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. सद्या उन्हाळ्यात पाणी व अन्न जंगलात फारसे उपलब्ध नसल्याने वन्यप्राणी भटकंती करत आहेत. हे वन्यजीव माणसे व जनावरांच्यावर हल्ले करत आहेत. वन्य प्राणी जंगलात राहावे त्यांना पाणी किंवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी जंगल तळे व ठिकठिकाणी गवत लावून त्यांना अल्प प्रमाणात असेना परंतु त्यांना चरण्यासाठी व जंगलातून वस्तीकडे येवू नयेत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी वेळोवेळी शेतकरी वर्ग व आंदोलन यांनी केली आहेत. शासन धोरण वन्य प्राण्यांच्या जीवाशी, शेतकऱ्यांच्या पिकांशी व मनुष्य, पाळीव प्राण्यांच्या जीवाशी खेळ करत आहे. असे शेतकऱ्यांचे मत आहे.
याबाबत योग्य ती उपायोजना करावी अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावे लागेल असे आजरा तालुक्यातील नागरिक भावना व्यक्त करत आहेत.