Homeकोंकण - ठाणेजीवघेण्या कॅन्सर विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित🛑गणेशोत्सवासाठी मध्य व...

जीवघेण्या कॅन्सर विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित🛑गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या.🟥विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात बुडाल्या.

🛑जीवघेण्या कॅन्सर विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
🛑गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या.
🟥विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात बुडाल्या.

🛑जीवघेण्या कॅन्सर विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित

न्यूयाँर्क :- वृत्तसंस्था.

कॅन्सर रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कॅन्सरविरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी mRNA ही लस विकसित केली आहे. ही लस फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रायोगिक mRNA लस विकसित केली आहे. ही ट्यूमर विरुद्ध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ही लस, इम्यून चेकपॉईंट इनहिबिटरसारख्या मानक इम्युनोथेरपी औषधांसह एकत्रित केल्यावर, उंदरांमध्ये मजबूत अँटी-ट्यूमर प्रभाव दर्शवते.

या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ते विशिष्ट ट्यूमर प्रथिनांना लक्ष्य करत नाही, परंतु विषाणूशी लढण्यासारख्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. ट्यूमरमधील PD-L1 प्रथिनाची अभिव्यक्ती वाढवून हा परिणाम साध्य झाला. यामुळे उपचारांसाठी ट्यूमरची संवेदनशीलता वाढते. प्रमुख संशोधक डॉ. एलियास सायूर, UF हेल्थ येथील बालरोग ऑन्कोलॉजिस्ट, यांनी एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, या शोधामुळे कर्करोगावर उपचार करण्याचा एक नवीन मार्ग मिळू शकतो जो केवळ शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीवर अवलंबून नाही.

हा पेपर एक अनपेक्षित आणि रोमांचक निरीक्षण दर्शवितो की, एक विशिष्ट नसलेली mRNA लस देखील ट्यूमर-विशिष्ट परिणाम निर्माण करू शकते, असं डॉ. सायूर म्हणाले. हा अभ्यास तिसरा उदयोन्मुख दृष्टिकोन सुचवतो. कर्करोगाला विशेषतः लक्ष्य न करता, परंतु मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करणारी लस कर्करोगाविरुद्ध प्रभावी प्रतिसाद निर्माण करू शकते, असं आम्हाला दिसून आले. कर्करोगाच्या रुग्णांसाठी, कदाचित सामान्य कर्करोग लस म्हणून, हे व्यापकपणे उपयुक्त ठरू शकते, असं अभ्यासाचे सह-लेखक डॉ. डुएन मिशेल म्हणाले.

डॉ. सायूर यांच्या टीमने आठ वर्षांपासून लिपिड नॅनोपार्टिकल्स आणि एमआरएनए वापरून कर्करोगविरोधी लसींवर काम केले आहे. गेल्या वर्षी, त्यांच्या प्रयोगशाळेत ग्लिओब्लास्टोमा, एक आक्रमक ब्रेन ट्यूमर, विरुद्ध एमआरएनए लसीची पहिली मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. यामध्ये रुग्णाच्या ट्यूमर पेशींपासून बनवलेल्या लसीने मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद दिला. या नवीन अभ्यासात, टीमने सामान्यीकृत एमआरएनए लसीची चाचणी केली. ही कोविड-19 लसीसारख्याच तंत्रज्ञानावर आधारित आहे. पण विशिष्ट कर्करोग पेशींना लक्ष्य करत नाही.

🛑गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या.

मुंबई :- प्रतिनिधी.

कोकणातील गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणा-या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून ५, तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

हजारो भाविक दरवर्षी आपल्या कोकणातील गावी गणेशोत्सवासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार असून, मुंबई, पुणे तसेच लो. टिळक टर्मिनस मुंबई येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव व चिपळूण या स्थानकांपर्यंत या विशेष फेऱ्या धावणार आहेत. सर्व गाड्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या अतिरिक्त गर्दीची आवश्यकता लक्षात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या घोषित विशेष गाड्यांमध्ये 1) 01151/52 – मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (रोज), 2). 01153/54 – मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज), 3) 01167/68 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक), 4) 01171/72 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक), 5) 01185/86 – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक), 6) 01165/66 – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक), 7) 01447/48 – पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक), 8) 01445/46 – पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक), 9) 01103/04 – मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (दैनिक), 10) 01129/30 – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (साप्ताहिक), 11) 01155/56 – दिवा – चिपळूण – दिवा (रोज) या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या अतिरिक्त गर्दीची आवश्यकता लक्षात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. यात रोज धावणार्‍या व साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेनेही कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी 22 विशेष रेल्वे फेर्‍या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये 9011/12 मुंबई सेंट्रल ते ठोकूर (साप्ताहिक), 09019/20 मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातील चार दिवस 4 दिवस), 09015/16 वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, 09114/13 बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), 09110/09 विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच खुले करण्यात येणार आहे.

🟥विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात बुडाल्या.
💥दोघींचे मृतदेह सापडले तर एकीचा शोध सुरू

सोलापूर :- प्रतिनिधी.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांवर शनिवारी सकाळी काळाने घाला घातला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. तर एक अनोळखी महिला आहे. तिची माहिती मिळू शकलेली नाही.

ही घटना शनिवारी सकाळी घडली. या तीन महिला भक्त पवित्र स्नानासाठी पंढरपूरजवळील पुंडलिक मंदिराच्या जवळ चंद्रभागा नदीमध्ये उतरल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाची गती वाढली असून पाण्याची पातळीही वाढली आहे. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे या महिलांना अचानक जोरदार प्रवाहात ओढले आणि त्या बुडाल्या.या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. आसपासच्या लोकांनी आणि इतर भाविकांनी आरडाओरड करून मदत मागितली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेनंतर तात्काळ स्थानिक प्रशासनाचे जवान, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर दोन महिलांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या महिलेचा शोध अजूनही सुरूच आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.