Home कोंकण - ठाणे राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता.- ३१ जिल्ह्यांना हवामान खात्याचा...

राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता.- ३१ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट.- आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पहा खालील👇 दिलेल्या लिंक वर..

Oplus_131072

🟥राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता.- ३१ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट.- आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पहा खालील👇 दिलेल्या लिंक वर..

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३१ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अहिल्यानगर येथे विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.