Homeकोंकण - ठाणेदोन एस. टी. बसेसचा अपघात.- समोरासमोर बसली धडक.- चालकांसह २५ हून अधिक...

दोन एस. टी. बसेसचा अपघात.- समोरासमोर बसली धडक.- चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी.. डेपो सावंतवाडी.

🟥दोन एस. टी. बसेसचा अपघात.- समोरासमोर बसली धडक.- चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी.. डेपो सावंतवाडी.

सावंतवाडी :- प्रतिनिधी.

वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजी येथे जाणाऱ्या तसेच सावंतवाडीहून शिरोडा येथे जाणाऱ्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रिक्षा तसेच मिळेल त्या वाहनातून उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी ३.३० च्या सुमारास आजगाव डीएड कॉलेजलगत वळणावर झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवाडकर, अशोक रेवाडकर, गणेश रेवाडकर, आनंद कळसुलकर, शुभम परब, सूर्या पांढरे, सुनील आजगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. मुसळधार पाऊस असल्याने मदत कार्यात मोठी अडचण येत होती. तरीही स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य करीत जखमींना त्वरित उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल केले. घटनास्थळी कोणीही एसटीचे अधिकारी अथवा पोलीस दाखल झाले नव्हते असे समजते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.