आजरा – राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका स्थलांतरित करा.
( शिवसेना.- उद्धव बाळासाहेब ठाकरे.- आजरा पक्षाची निवेदनाने मागणी. )
आजरा.- प्रतिनिधी.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) आजरा तालुकाच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की आजरा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका स्थलांतरित करा याबाबत निवेदनात म्हटले आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा एम.आ.डी.सी. जवळ बसविलेला टोल नाकाच्या विरोधात आजरा तालुक्यातील लोकांना टोल माफ व्हावा यासाठी गेली १ वर्ष सर्व पक्ष संघटना विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे काढत आहेत. यावर तोडगा निघण्या अगोदरच अधिकारी यांनी टोल वसुली ची माहिती प्रसिद्धीस देऊन अचानक टोल चालू करणार अशी माहिती नागरिकांना समजली.
टोल वसूल करणार असे माहिती पडल्यानंतर टोल विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही मोर्चा देखील काढला यावेळी आपल्या विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी व तालुक्यातील नागरिक यांची पुढील बैठक होईपर्यंत टोलला स्थगिती दिली आहे.
परंतू तात्पुरती स्थगिती देवून लोकांच्यावर होणारा अन्याय दूर होणार नाही. यासाठी कायम स्वरुपी तालुक्यातील नागरिकांना टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी हा टोल आजरा तालुक्यातील शेवटचे गाव किटवडे येथे हलवण्यात यावा. यामुळे आपली टोल वसुलीही चालू राहील व तालुका वासियांना देखील यातून सुटका होईल. या आधी देखील आम्ही शिवसेनेच्या वतीने ४ एप्रिल २०२४ रोजी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना टोल किटवडे येथे हलविनेबाबत निवेदन दिलेले होते. तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. यातून पर्याय एकच. एकतर टोल आजरा तालुक्याच्या बाहेर चालू करा व या ठिकाणी करत असाल तर आजरा तालुक्याला टोल माफ करा. अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख ओमकार माद्यळकर, तसेच युवा सेना शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.