आजऱ्यात चूकीच्या गटर्स बांधकाम प्रकरणी समितीच्या लढ्याला यश .- आम. आबिटकर यांची भेट.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत हद्दीतील गांधीनगर कडे जाणाऱ्या गटर्सचे बांधकाम चूकीच्या पद्धतीने होत असल्याची वेळोवेळी सुचेना व तक्रार देवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी आम. प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली यावेळी ठेकेदाराला नियमानुसार बांधकाम करण्याच्या सक्त सूचना आम. आबिटकर यांनी दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील गटर्सचे चूकीच्या पद्धतीने बांधकाम सुरु होते. या गटारीच्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होणारा होता. याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.कार्यवाही करण्याचे आश्वासन देवूनही ते पूर्ण न केल्याने समितीने आम. श्री. आबिटकर यांची भेट घेऊन समस्या सांगितली. संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन रस्त्याच्या हद्दी प्रमाणे गटर लाईन मारुन घेण्याच्या सूचना केल्या. समितीच्या लढ्याला यश आले असून या गटारीच्यामुळे आता रस्ताही रुंद होणार असून वाहतूकीला सोईचा होणार आहे. समितीच्या वतीने अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, जावेद पठाण यांनी भेट घेतली.