राष्ट्रीय महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमणूक करावी. आजरा शिवसेना शिंदे गटाची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शिवसेना शिंदे गट.- वतीने राष्ट्रीय महामार्ग बाबत निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा गडहिंग्लज सावंतवाडी तालुक्यांमध्ये संकेश्वर ते आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच च्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी आजरा तालुक्यातील तेरा गावातील जमीन भूसंपादन करणेबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ कलम ३ (जी) अन्वये नुकसान भरपाईचा निवाडा निश्चित केला आहे.
सदर विषयांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णपणे ऐकून न घेता निवाडा झालेला असून निवाड्यामध्ये त्रुटी आहेत. सदर निवाड्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी लवादाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
सदर रस्त्याचे ठेकेदार हेतूपुरस्कर काही शेतकऱ्यांचे बरोबर साठे लोटे करून जमिनीची मोजणी रेखांकनामध्ये बदल करून इतर शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असून पूर्वी संपादित केलेल्या जमिनीच्या तहसिलदार कार्यालय आजरा रेखांकनामष्ठेये हस्ती करतेवेळी फेरबदल केले आहेत. त्याचीही चौकशी होणे गरजेचे असून रुंदीकरण आणि कायदा मजबुतीकरण करणेकामी समानता दिसून येत नाही. असे शेतकऱ्यांचे मत झाले आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर तालुकाप्रमुख संजय पाटील सह बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.


