HomeUncategorizedलोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिलाशक्ती. 👉महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ. 🟥मुंबई -गोवा...

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिलाशक्ती. 👉महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ. 🟥मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव नजीक रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात 👉तीन ठार

🛑लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिलाशक्ती.
👉महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ.
🟥मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव नजीक रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात 👉तीन ठार

मुंबई :- प्रतिनिधी.

आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येते. त्यामुळे भविष्यात कुणाचं सरकार देशात येणार हे ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
🟥२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
🔴महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, ‘स्‍वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे. २०१९ मध्ये एकूण मतदार ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

🟥मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव इथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात 👉तीन ठार

🟣मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव इथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.‌
🅾️७ एप्रिल रविवारी रोजी ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे.घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिकांसोबत तात्काळ मदत कार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे आणि आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या भीषण दुर्दैवी अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू आहे.मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव परिसरात यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या मोठ्या अपघातात हेदवी येथील एकाच घरातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव इथे अनेकदा ट्रॅफिक जाम होण्याचे ही प्रकार अनेकदा घडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.