HomeUncategorizedउद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर.पहा संपूर्ण यादी…👇🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष.-...

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर.पहा संपूर्ण यादी…👇🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष.- निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा.-आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना.🛑व्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ .- ‘एम.पी.एस.पी.’परीक्षेत राज्यात प्रथम.

🛑उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर.पहा संपूर्ण यादी…👇
🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष.- निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा.-
आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना.
🛑व्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ .- ‘एम.पी.एस.पी.’परीक्षेत राज्यात प्रथम.

मुंबई..- प्रतिनिधी.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकलं झाली आहेत. भाजपाने आत्तापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच शिवसेनेने आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने २१ उमेदवार जाहीर केले आहेत.

🔴शिवसेना ठाकरे गटाने १७ जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता चार नावांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चार नावांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढणार आहेत. हातकणंगलेतून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

🛑शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण कोण?

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ
३) संजोग वाघेरे-पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टीकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाई वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
१४) अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
१५) अमोल किर्तीकर-मुंबई – वायव्य
१६) अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
१७) संजय जाधव – परभणी
१८) वैशाली दरेकर-कल्याण
१९)सत्यजीत पाटील-हातकणंगले
२०) करण पवार-जळगाव
२१) भारती कामडी-पालघर
🟥कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे. तर, महायुतीत या जागेवरून भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर, ठाकरे गटाकडे या जागेसाठी पात्र उमेदवार सापडत नसल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या.

🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष.- निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा.-
आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना.

आजरा.- प्रतिनिधी.

आंबेओहोळ धरणाची सुरुवात २००० साली झाली. कायद्याने पुनर्वसन व्हावे. म्हणून सुरुवातीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करणान्या धरणग्रस्तांना झेलमध्ये टाकून काम चालू केले त्यानंतर पुनर्वसन कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याशिवाय घळभरणी करता येणार नाही. म्हणून विनंती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वर पुन्हा केसेस घालून जेलमध्ये टाकून घळ भरण्याचे काम पूर्ण केले. सद्या धरणात पाणीसाठा १०० टक्के झाला असताना देखील पुनर्वसन पूर्ण झालेली नाही.
अद्याप एकही गुंठा जमीन न मिळालेले १०० शेतकरी व अर्ध पुनर्वसन झालेले ५० शेतकरी तर भूखंड न मिळालेले ३० हून अधिक शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत. संकलन दुरुस्ती न झालेले काही शेतकरी आहेत म्हणजे २०० च्या वर पुनर्वसन बाकी असणारे स्वतंत्र कुटुंब संख्या धरल्यास २५० च्या वर पुनर्वसनापासून कुटुंबे वंचित आहेत असे असताना कोणीही लोकप्रतिनिधी पुनर्वसनाकडे गांभीर्याने पहात नाहीत अगर ज्यांच्यावर पुनर्वसनाची जबाबदारी दिली आहे. ते अधिकारी देखील धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे गेली २३ वर्ष पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी धरणग्रस्त पूर्णपणे निराश झाले आहेत. आमची एक पिढी गेली आता तरी पुनर्वसन करावे नाहीतर आम्ही शेतकयांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसनाची बैठक होत नसेल व शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही येथून पुढे कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. असा सामूहिक निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा आमचा हक्क आहे परंतु आमचा नाईलाज झाला असून हा निर्णय आम्ही ना विलाजाने घेत आहोत याची कृपया अधिकाऱ्याऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. असे आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना कॉ. शिवाजी गुरव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रति १) मा. जिल्हाधिकारी सो कोल्हापूर.
२) मा. प्रांताधिकारी सो गडहिंग्लज ३) मा. प्रांताधिकारी सो आजरा-भुदरगड.,४) मा. तहसीलदार सो, आजरा.,५) मा. पो.नि.सो आजरा.

🛑व्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ .- ‘एम.पी.एस.पी.’परीक्षेत राज्यात प्रथम

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘एम.पी.एस.पी.’या शालेय स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन केले. प्रशालेची विद्यार्थिनी कु. सौश्रुती अमित पुंडपळ या विद्यार्थिनीने ‘एम.पी.एस.पी’ परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
श्रुती पुंडपळ (२८४ गुण ) राज्यात प्रथम, विवेक पाटील (२८० गुण ) राज्यात तिसरा, विभावरी जावळे ( २६८ गुण ) राज्यात चौथी, स्वराज प्रवीण निंबाळकर (२५४ गुण) राज्यात २१ वा, संस्कृती इलगे ( २४४ गुण) राज्यात ४१ वी, अर्णव जाधव (२४० गुण) राज्यात ४९ वा) संस्कार तेजम (२३६ गुण) राज्यात ५८ वा, कार्ति दळवी ( २२४ गुण ) राज्यात ९५ वा
वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना विषय शिक्षक पी. एस. गुरव श्रीमती ए .बी.पुंडपळ श्रीमती एस.के.कुंभार, व्ही.ए.चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले.प्राचार्य आर.जी.कुंभार सर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे चेअरमन जयवंत शिंपी व सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.