HomeUncategorizedसह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी रवाना.🛑व्यंकटराव प्रशालेचे 'बीडीएस' परीक्षेत सुयश…

सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी रवाना.🛑व्यंकटराव प्रशालेचे ‘बीडीएस’ परीक्षेत सुयश…

🛑सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी रवाना.
🛑व्यंकटराव प्रशालेचे ‘बीडीएस’ परीक्षेत सुयश…

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी वयाच्या ४ वर्षे ७ महिन्याची कु. अन्वी चेतन घाटगे हीने वयाचे २ वर्षे ११ महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर “कळसूबाई “व ३ वर्ष ५ महिन्याचे असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर ”मूल्ल्यणगीरी” हे सर करून ही शिखरे सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला आहे. तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेले आहे.
७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक आरोग्य दिन आणि या दिनाचे अवचित्य साधून “निसर्ग, पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा” , हा संदेश देत सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर अण्णामुडी (८८४२ फुट) व मिसापुल्लीमला ( ८६६१ फुट)हे शिखर तर ९ एप्रिल मराठी नवीन वर्षानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व् तमिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडबेटटा (८६५२ फुट )हे शिखर .तसेच ११ एप्रिल क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व् तमिळनाडू राज्यातील दुसरे सर्वोच्च कोलारीबेट्टा (८६२९ फुट) शिखर सर हे शिखर सर करून पुन्हा एकदा जागतिक् विक्रम नोंदवणार आहे.
तिच्या या मोहिमेसाठी ,मुख्य वनसंरक्षक आर् एम .रामानुजन सर, जी गुरुप्रसाद IFS, अधिष्ठाता (डीन) डॉ.सत्यवान मोरे सर .डॉ शिशीर मिरगुंडे सर, वैद्यकीय अधीक्षक सी पी आर हॉस्पिटल, शशिकांत रावळ,समाजसेवा अधीक्षक, डॉ. भावना खंदारे, डॉक्टर तेजल रुद्रा ,महेंद्र चव्हाण …
तसेच अक्षय कुमार फॅन क्लब कोल्हापूरचे राम कारंडे, महिपती संकपाळ व सौ हार्डेकर,
विचारवंत लेखक प्राध्यापक किसनराव कुराडे तसेच अनेक संस्था संघटना यांनी शुभेच्छा दिल्या.

व्यंकटराव प्रशालेचे ‘बीडीएस’ परीक्षेत सुयश

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील इ. ५ वी व इ.७ वी या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत( बी.डी.एस.) चांगले यश संपादन केले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
१)काव्या विनायक गावडे इयत्ता पाचवी (ब्राँझ मेडल)
२) विवेक धनाजी पाटील इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
३) सौश्रुती अमित पुंडपळ इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
४)विभावरी विक्रम जावळे इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)
५) संस्कृती धनाजी इलगे इयत्ता सातवी (सिल्वर मेडल)
वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिक्षक ए.वाय.चौगुले, पी.एस.गुरव, श्रीमती ए .बी.पुंडपळ यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य आर.जी.कुंभार सर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे चेअरमन जयवंत शिंपी व सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.