🟥मॉरिसने सगळ्या गोळ्या घोसाळकरांना मारल्या मग स्वत:ला कसं संपवलं? – सर्वात मोठी बातमी समोर
🛑भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला.- 🟥अजित पवारांनी दिले कारवाईचे आदेश.
मुंबई – प्रतिनिधी.

मुंबईमधील दहिसर येथे ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तथाकथित नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या मॉरिस भाई याने कार्यालयात बोलावून घेत फेसबुक लाईव्ह करत गोळ्या घातल्या. या प्रकरणामध्ये सर्वांना प्रश्न पडलाय की मॉरिस भाईने गोळ्या मारल्यावर स्वत:ला कसं संपवलं? याबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.
🅾️मॉरिसने स्वत:ला कसं संपवलं?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यामध्ये खटके उडाले होते. एका प्रकरणामध्ये मॉरिस भाई जेलमध्ये गेला होता. आपल्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी घोसाळकर यांचाच हात असल्याचा त्याचा समज होता. जेलमधून बाहेर आल्यावर शांत डोक्याने त्याने प्लॅन केला. मॉरिसच्या पत्नीने दिलेल्या जबाबाप्रमाणे तो अभिषेक घोसाळकर यांना संपवणार असल्याचं कायम बोलत आला होता.
🅾️मॉरिसने गुरूवारी अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमासाठी बोलावलं. फेसबुक लाईव्ह करत आता समाजसेवेसाठी आम्ही एकत्र काम करत असल्याचं त्याने सांगितलं. फेसबुक लाईव्ह संपत आल्यावर त्याने शेवटला दोन शब्द बोला घोसाळकरांना म्हणाला. तितक्यात त्याने गन काढली आणि घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला.या गोळीबारामध्ये मॉरिस भाई याने घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. तर यामधील चार गोळ्या घोसाळकरांना लागल्या होत्या. घोसाळकर बाहेर पळून जात होते मात्र जखमी अवस्थेत ते बाहेर रस्त्यावर पडले. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यानंतर त्यांना जवळच्या करूणा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.
🟪गोळ्या मारताना मॉरिस भाई याने संपूर्ण गन खाली केली होती. त्यानंतर मॉरिस याने त्याच्या ऑफिसमधील पोटमाळ्यावर पुन्हा गोळ्या भरल्या. त्यानंतर स्वत: च्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. घोसाळकर यांना रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
🛑भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला.- 🟥अजित पवारांनी दिले कारवाईचे आदेश
पुणे – प्रतिनिधी.
पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत ‘लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
🟥या कार्यक्रमाला भाजपचा विरोध होता. निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत वागळे ठाम होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्रकार निखिल वागळे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीवर आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेत गाडीची तोडफोड करण्यात आली असून गाडीवर शाईफेकही केली. दांडेकर पूल चौकामध्ये देखील निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
🔴दरम्यान, निखिल वागळेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे कोणताही प्रकार सहन करता येणार नाही असे अजित पवार म्हणाले. निखिल वागळे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल ट्वीट केले होते. त्यावरुन भाजपकार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
🛑निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या अंगावर देखील शाईफेक करण्यात आली. याघटनेवर आता पुढे पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
