HomeUncategorizedमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कार्य घराघरात पोहचवा – आमदार प्रकाश आबिटकर भुदरगड...

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कार्य घराघरात पोहचवा – आमदार प्रकाश आबिटकर भुदरगड तालुका शिवसेना, महिला आघाडी, किसान आघाडी व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे वाटप संपन्न

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कार्य घराघरात पोहचवा – आमदार प्रकाश आबिटकर
भुदरगड तालुका शिवसेना, महिला आघाडी, किसान आघाडी व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे वाटप संपन्न

गारगोटी प्रतिनिधी,


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 ते 18 तास काम करत असून ते सर्वसामान्य नागरीकांना गरजेचे असणारे निर्णय तात्काळ घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे कार्य घरात पोहचविण्यासोबतच पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी सर्वांनी पोहचवा असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे भुदरगड तालुका शिवसेना, महिला आघाडी, किसान आघाडी व युवासेनेच्या 60 हून अधिक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार लोकोपयोगी निर्णय घेत आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. 

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेचे व विविध आघाडींचे संघठन मजबूत केले जात आहे. तरुण, महिला, युवती यासह किसन सेनेशी जोडले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून राज्यातील अनेक नागरीक सेनेत येत आहेत.

पादाधिकारी निवडी पुढीलप्रमाणे – शिवसेना उपतालुकाप्रमुख शहाजी देसाई, भरत शेटके, साताप्पा कल्याणकर, संदीप पाटील, महिला आघाडीप्रमुख आक्काताई नलवडे, महिला उपतालुकाप्रमुख रुपाली राऊत, किरण गुरव, सिमा चव्हाण, गारगोटी शहरप्रमुख रणधिर शिंदे, युवसेना उपतालुकाप्रमुख निलेश देसाई, शंभू देसाई, विशाल वायदंडे, किसान सेना तालुकाप्रमुख युवराज आरडे, किसान उपतालुकाप्रमुख रघुनाथ बोटे, कृष्णात जरग, एम.बी.बोटे, बी.एस.खापरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, माजी सभापती बाबा नांदेकर, सुर्याजीराव देसाई, अशोकराव फराकटे, मदनदादा देसाई, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, अंकुश चव्हाण, बी.डी.भोपळे, अशोक वारके, जयवंत चोरगे, सुनिलराव निंबाळकर, श्रीधर भोईटे, विजय आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी मानले.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.