श्री देव रवळनाथ मंदिराचा नवरात्र उत्सव विविध उपक्रमाने उत्साहात साजरा होणार.- श्री रवळनाथ देवालय उपसमिती,आजरा. / खास. मंडलिकांच्या फंडातून करोडोंचा निधी.- आजरा शहर विकासासाठी आमुल्य योगदान.- नगरसेवक अभिषेक शिंपी.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री देव रवळनाथ मंदिराचा नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे अत्यंत उत्साहात होत आहे. २०२३ वर्षीत होणारा नवरात्र उत्सव अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन श्री रवळनाथ देवालय, उपसमिती वतीने करण्यात आले आहे. रविवारी पारंपारिक पद्धतीने सनई ताशांच्या वाद्यात मंदिरात घटस्थापना व दुर्गामाता स्थापना करून अत्यंत भक्तिमय वातावरणात नवरात्राची सुरुवात झाली.सोमावार दि.१६ ऑक्टोबर,२०२३ पासून २४ ऑक्टोबर पर्यंत पहाटे ४:०० ते ६:०० या वेळेत काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी खंडोबा तालीम,आजरा आयोजित सामुदायिक कुंकुमार्चन सायंकाळी ५:०० वाजता व मसवाईदेवी भजनी मंडळ, मासोली यांचा कार्यक्रम होणार आहे.बुधवारी १८ रोजी विठ्ठलदेव भजनी मंडळ,चाफवडे व गुरुवारी दत्तपंथी भजनी मंडळ,कडगाव यांचे भजन होणार आहे. शुक्रवारी ४:०० वाजता संगीत विशारद अजीत तोडकर यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी ४:००ते ७:०० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व रात्री ९:०० वाजता सन्मित्र भजनी मंडळ,यांचे भजन होणार आहे.शनिवार २१ रोजी विठ्ठलपंथी भजनी मंडळ,दुर्गुळवाडी,ता.करवीर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री देव रवळनाथांच्या शारदीय नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण व थरार म्हणजे डोक्यावरील आरती ही रविवारी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. खंडे नवमी रोजी बामणादेवी भजनी मंडळ,जेऊर यांचे भजन व महिलांसाठी रास दांडिया होणार असून विजयादशमी रोजी पारंपारिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार आहे. देवलयातील सर्व अभिषेक,काकडा आरती,डोक्यावरील आरती हे सर्व कार्यक्रम श्री रवळनाथ देवालय,आजरा फेसबुक पेज वर दाखवण्यात येणार आहे.यासाठी सोबत या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रवळनाथ देवालय उपसमिती,आजराच्या वतीने करण्यात आले आहे.
खास. मंडलिकांच्या फंडातून करोडोंचा निधी.- आजरा शहर विकासासाठी आमुल्य योगदान.- नगरसेवक अभिषेक शिंपी.
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या मार्फत मा.जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या प्रयत्नातून आजरा शहरा साठी रुपये ९० लाख किंमतीचे २० सोलरहायमास्ट दिवे व आपटे कॅालणी येथील ओपन स्पेस मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक प्रेरणा उद्यान, बगीचा विकसित करने साठी रुपये ५० लाख असा एकत्रित १ कोटी ४० लाख रुपयेच्या मंजुर निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली… लवकरच टेंडर प्रक्रिया होवुन प्रत्यक्ष काम सुरु होईल खास.श्री. मंडलिक यांच्या मार्फत आत्ता पर्यंत विकास कामे झाली यामध्ये १) सौर प्रकल्प १४० लाख २) शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी १० लाख ३) अंतर्गत गटर्स साठी ७० लाख ४) वडाचा गोंड नदी घाट १५ लाख ५) आवंडी वसाहत स्ट्रिट लाईट १५ लाख ६) सोलर हायमास्ट ९० लाख ७) आपटे कॅालणी बगीचा विकास ५० लाख
असा करोडोंचा निधी देवुन आजरा शहर विकासासाठी आमुल्य योगदान दिल्या बद्दल तमाम आजरा वासियांकडुन जाहिर आभार. याबाबतची माहिती नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी दिली.
