पुढील पाच वर्षासाठी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी द्या. – समरजितसिंह घाटगे. ( मडिलगेत समरजित आपल्या दारी / रस्ते विकास व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. ) – [🛑 अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण? 】 【 🛑 शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार.- तर ठाकरे गटाचा आवाज घुमणार शिवाजी पार्कवर●】
आजरा.- प्रतिनिधी.

पुढील पाच वर्षासाठी आमदार म्हणून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. विकास हवा तर आमदार नवा. “या टॅग लाईन वर” समरजीत आपल्या दारी व पूर्ण झालेल्या रस्त्याचा शुभारंभ, दुर्गामाता मंडळांना भेट व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार दि १६ रोजी कागल विधानसभा मतदारसंघातील मडिलगे येथील लोकमान्य संस्था समूह व भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समरजीतसिंह घाटगे बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी होते. स्वागत व प्रास्ताविक लोकमान्य संस्था समुहाचे प्रमुख जनार्दन निऊगरे यांनी केले.
पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले मी झालेल्या विकास कामाचा शुभारंभ करतो नारळ फोडून विकास झाला की नाही हे पाहण्यासाठी यावं लागत नाही. मुळातच विकास काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे उद्घाटन करायचं असतं. माझे कार्यकर्ते हे चांगल्या पद्धतीने काम भ्रष्टाचार न करता करतात तसं विद्यमान आमदारानी सांगावं व वक्तव्य करावं की माझे कार्यकर्ते भ्रष्टाचार करत नाहीत. कारण जनतेची कामे करणे हे माझं कर्तव्य आहे. मतदान कोणी केलं व कोणी केले नाही. हे बघण्याचं काम विद्यमान आमदारांकडे आहे. मला ज्यांनी मतदान केले नाही. त्यांचं अगोदर मी काम करतो. विद्यमान आमदार ज्यानं मतदान केलं त्याचं फक्त काम करतात. अशी परिस्थिती कागल विधानसभा मतदारसंघात आहे कागल विधानसभा मतदारसंघातील उत्तुर जिल्हा परिषद मध्ये ११५२ लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. आज लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटतं यासाठी अशीच नेहमी सेवा करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावा. यासाठी “समरजित आपल्या दारी” हा उपक्रम असल्याचे शेवटी बोलताना श्री घाटगे म्हणाले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री चराटी म्हणाले येणाऱ्या काळात मडिलगे येथे हनुमान समूह व लोकमान्य समूह हा एकत्रितपणे कसा काम करत गावची सेवा करेल यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वी ज्या चुका झाल्या आहेत त्या परत होऊ नये याकडे लक्ष दिले जाईल तसेच आपल्या गावातील विकास कामासह अन्य लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही भाजपच्या वतीने तत्पर आहोत. आपण समरजित घाटगे यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहावे. महाराष्ट्र शासनाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालू आहे. व चालू होता भाजप सेनेचे सरकार असताना तिसऱ्याने येऊन अडचण केली आहे. असे बोलताना श्री चराटी म्हणाले.
यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे चेअरमन जितेंद्र टोपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून श्री. निऊगरे यांनी समरजित राजे घरोघरी या कार्यक्रमाचं ध्येय, ध्यास व उद्देश फक्त इतकाच की जनतेची सेवा आहे. समाजाची सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कागल विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत ७५ हजार लोकांना राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ वी निमित्ताने लाभ देण्याचे मातोश्रीच्या आदेशाचे पालन राजे समजीतसिंह घाटगे करत आहेत. त्यांना आपण साथ देऊया असे श्री निऊगरे बोलताना म्हणाले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, शाहू कारखाना संचालिका सुजाता तोरस्कर, रेखाताई पाटील, अतिशकुमार देसाई, विठ्ठल उत्तूरकर, संजय केसरकर, कपिल अजगेकर, विश्वजीत मुंज सौ. नुलकर वहिनी सह लोकमान्य संस्था समूहाचे सर्व संस्थेचे चेअरमन व्हा. चेअरमन संचालक सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजीत मोहिते यांनी आभार मानले.

[ मडिलगे येथे झालेल्या या कार्यक्रमात झालेल्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ, दुर्गादेवी मंडळांना भेट, लाभार्थी यांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद, तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,कला, सांप्रदायिक क्षेत्रासह विविध कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी विठ्ठल उत्तुरकर यांना उत्तुर जिल्हा परिषदेच्या तयारी लागावे अशा सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सांगता समारंभ नंतर लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन श्री घाटगे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.]
【 🛑 अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण? 】
मुंबई – प्रतिनिधी.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होताच जुन्या एका प्रकरणानं डोकं वर काढलं आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी तत्कालीन पालकमंत्री (अजित पवार) यांच्यावर आरोप केले.तर मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, अजितदादांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर नेमक्या कोण आहेत?
🛑कोण आहेत मीरा बोरवणकर?
मीरा बोरवणकर कोण आहेत? हे जाणून घेण्याआधी त्यांनी 2010 मध्ये पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर काय आरोप केले यावर एक नजर टाकूया. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं होतं हे सांगितलं.
🔴पालकमंत्र्यांच्या हातात येरवडा पोलीस ठाण्याचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की, ‘या जागेचा लिलाव झालेला आहे. तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा. पण, त्यासाठी मी त्यांना नाही म्हटलं’, असा दावा बोरवणकरांनी केला आहे. बोरवणकरांच्या याच आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.पण,थेट अजित पवारांना भिडणाऱ्या आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या मीरा बोरवणकर कोण आहेत? याचविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
🛑मीरा बोरवणकर या 1981 मध्ये महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या होत्या. IPS अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या शहरात त्यांची बदली झाली. पण त्यांनी 1994 साली जळगावातील सेक्स स्कँडल उघडकीस आणलं आणि त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या. तेव्हाही त्यांची भूमिका महत्वाची होती.
मुंबईतील गुंडाराज संपवण्यामागे मीरा बोरवणकर यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी अंडरवल्डमधील दाऊद इब्राहीम आणि छोटा राजनच्या टोळीतील गुंडांना तुरुंगात टाकलेलं. त्यामुळे मुंबईतल्या या डॉनची टोळी सुद्धा मीरा बोरवणकर यांना घाबरायची. अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची, तारिक परवीन आणि शर्मिला सीताराम नाईक उर्फ शर्मिला शानभाग यांच्या प्रत्यार्पणात देखील बोरवणकरांचा मोठा वाटा आहे.
इतकंच नाहीतर त्या तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांच्याच निगराणीत याकूब मेमनला नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. पोलीस कारकिर्दीतला त्यांचा दरारा पाहून त्यांना लेडी सुपरकॉप म्हणून ओळखलं जायचं. मीरा बोरवणकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं म्हणजे त्या मूळच्या पंजाबमधल्या फाजिल्काच्या रहिवासी आहे. त्यांचे वडील ओ. पी. चढ्ढा हे बीएसएफमध्ये होते.
मीरा यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण फाजिल्का इथल्या सरकारी शाळेतून झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांची जालंधरला बदली झाली. त्यामुळे मीरा यांनी पुढचं शिक्षण जालंधरमधून पूर्ण केलं. पुढे महाराष्ट्रात नोकरीला असल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली. अशा या लेडी सुपरकॉप 2017 साली निवृत्त झाल्या.आता त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून त्यांनी तेव्हाचे पालकमंत्री म्हणजे अजित पवारांवर आरोप केले आहेत. अजित पवार, शिंदे-भाजपसोबत सत्तेत गेले. त्यानंतर यथावकाश अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रिपदही मिळालं. पण त्यानंतर काहीच दिवसात हे 2010 चं प्रकरण समोर येणं त्यावरून त्यांच्यावर आरोप होणं. त्यावरून आता पुढे काय घडतं हे बघणं महत्वाचं आहे.
【 🛑 शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार.- तर ठाकरे गटाचा आवाज घुमणार शिवाजी पार्कवर●】
मुंबई:- प्रतिनिधी.

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. क्राॅस मैदान यावर क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.
🟥दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यसाठी यंदादेखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दसरा मेळावा आता कुठे घ्यायचा यावर पक्षामध्ये बरीच चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर शिंदे गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
🔴दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे सध्या शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. पण शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरेंचा शिवाजी पार्क मैदानासाठीचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. पण, याचा अर्थ ठाकरेंना मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित होत होता. पण मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? या प्रश्नाचा निकाल अखेर लागला.
🟥दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन यंदाही शिंदे व ठाकरे गटामध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रॉस मैदान किंवा आझाद मैदान या दोन मैदानांचा पर्याय ठेवण्यात आला होता. मात्र आता आझाद मैदानावर शिंदे गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. मागील वर्षी मैदानावरुन झालेल्या वादात न्यायालयाने हस्तक्षेप करून मैदान ठाकरे गटाला दिले होते. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं. आता त्यांनी आझाद मैदान निवडलं आहे.
