व्यंकटराव येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न. ( तालुक्यात अनेक ठिकाणी राजश्री शाहू जयंती निमित्त केले वृक्षारोपण. )
आजरा. – प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये लोक राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. शिंपी यांनी राजश्री शाहू महाराजांचा आढावा दिला सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज…! जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेल्या छत्रपती शाहू महाराज आढावा देत जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी प्रशालेच्या पटांगणाच्या कडेला उपस्थित मान्यवर अध्यक्ष श्री शिंपी यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासो पाटील, सचिव एस पी कांबळे, प्राचार्य श्री आर जी कुंभार, सर्व संचालक, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य श्री कुंभार यांनी आभार मानले.

आजरा हायस्कूल आजरा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाहू महाराजांच्या विषयी कु सानिका माने हिने भाषण केले तर सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील शाहू महाराजांच्या कार्याची माहिती विभाग प्रमुख गौतम कांबळे यांनी दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात सहभागी व्हावे असे मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी यांनी अहवान केले, शाहू जयंती निमित्त हरित सेना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी, पर्यवेक्षक संभाजी होलम , विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सण सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले सूत्रसंचालन संतोष कालेकर यांनी केले तर आभार किरण कांबळे यांनी मानले

देवर्डे शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.
देवर्डे शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली देवर्डे येथील विद्यामंदिर श्री रवळनाथ हायस्कूल मध्ये शाहू जयंती साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन चंद्रकांत घुरे यांनी केले व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी साईनाथ राणे शिवराज बागडी कस्तुरी जाधव या विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच श्रीकांत पाटील सुनील पाटील देवेंद्र शिखरे चंद्रकांत घुरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी मुख्याध्यापक नामदेव माईनकर सुभाष सावंत महादेव तेजम सरोजिनी कुंभार रेश्मा बोलके या शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर आभार महेश नावलगी यांनी मानले
