Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा; सभासदांना १० टक्के...

स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा; सभासदांना १० टक्के लाभांश.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा; सभासदांना १० टक्के लाभांश.

आजरा, प्रतिनिधी

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेकडे ४ कोटी ५८ लाख रुपये वसूल भागभांडवल असून, १९२ कोटी ८८ लाखांपेक्षा अधिक ठेवी, १६१ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप आणि ३५४ कोटी १९ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय झाला आहे. बँक गुंतवणूक ५८ कोटी ५९ लाख रुपये असून संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे.


सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचा वाढता विश्वास आणि पदाधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे भुसारी यांनी सांगितले. यावेळी गुणवंत पाल्य, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. सभासदांनी मांडलेल्या विविध सूचनांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.