HomeUncategorizedमनसे आजरा पदाधिकारी बैठक संपन्न.- ( कार्यकाल संपल्यामुळे महिला आघाडीची जिल्हा व...

मनसे आजरा पदाधिकारी बैठक संपन्न.- ( कार्यकाल संपल्यामुळे महिला आघाडीची जिल्हा व तालुका स्थरावरील सर्व कार्यकारणी बरखास्त. )

मनसे आजरा पदाधिकारी बैठक संपन्न.- ( कार्यकाल संपल्यामुळे महिला आघाडीची जिल्हा व तालुका स्थरावरील सर्व कार्यकारणी बरखास्त. )

आजरा. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा कार्यकारणीची बैठक रविवार दि. २५ रोजी जन संपर्क कार्यालय आजरा येथे पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाका तेथे शाखा व गाव तेथे पदाधिकारी असे अभियान राबवणार शहरातील प्रत्येक नाक्यावर शाखा काढण्याचा मानस या बैठकीत करण्यात आला. बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले होते. यावेळी पक्ष.वाढीसाठी चर्चा झाली. तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पदाधिकान्यांचा कार्यकाल संपल्यामुळे महिला आघाडीची जिल्हा व तालुका स्थरावरील सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. लवकरच सौ. रिठाताई गुप्ता राज्याध्यक्षा महिला आघाडी संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे व जिल्हा अध्यक्ष श्री. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. या बैठकीस उपजिल्हाध्यक्ष सुधीर सुपल, ता. अध्यक्ष अनिल निगरे, ता. सचिव चंद्रकात सांबरेकर, ता. उपाध्यक्ष आनंदा घंटे, ता. उपाध्यक्ष,अँ. सुशांत पोवार, ता. अध्यक्ष महिला सरिता सावंत, ता. उपाध्यक्षा तेजस्विनी देसाई, नवी मुंबई येथील खारघर उपाध्यक्ष अरविंद घेवडे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आश्विन राणे, वि.से. ता. अध्यक्ष वैष्णव दळवी, गडहिंग्लज शहर अध्यक्ष केंपाना कोरवी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.