Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र जनता सहकारी गृहतारण संस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा संपन्न.

जनता सहकारी गृहतारण संस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा संपन्न.

जनता सहकारी गृहतारण संस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा संपन्न.

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेला गत आर्थिक वर्षात ६४ लाख ७५ हजार ४५० रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी केली. संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून पुणे व कागल येथे नवीन शाखा विस्तार करण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. संस्थेकडे ४६ हजार ठेवीदार व हितचिंतकांकडून १३२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. सभासदांना ३ हजार रुपयांची भेटवस्तू तसेच ५०० रुपयांचा बोनस शेअर देण्यात आला आहे. आतापर्यंत १०० रुपयांच्या शेअर्सला १ हजार रुपयांचा बोनस शेअर देणारी ही पहिली संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या वतीने ७५ वर्षे पूर्ण झालेले सभासद, पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचारी, विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


संस्थेला सहकारी भारती कोल्हापूर उत्कृष्ट संस्था व आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. संस्था स्व-भांडवलावर सुरू असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सभेचे सूत्रसंचालन प्रा. (डॉ.) संजीवनी पाटील यांनी केले. विषयपत्रिका, मागील सभेचे इतिवृत्त, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व अन्य अहवालांचे वाचन मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. उपाध्यक्ष प्रा. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रा. सौ. क्रांती शिवणे यांनी आभार मानले. संचालक, शाखा चेअरमन, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.