Homeकोंकण - ठाणेराष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते विकासातून विकास करा.- पण अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती...

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते विकासातून विकास करा.- पण अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा. ( राष्ट्रीय महामार्गाकडून शिवसेनेच्या निवेदनाला केराची टोपली का.? )

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते विकासातून विकास करा.- पण अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा. ( राष्ट्रीय महामार्गाकडून शिवसेनेच्या निवेदनाला केराची टोपली का.? )

आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांधा या महामार्गाचे सद्या काम चालू आहे. यामध्ये संकेश्वर पासून आजरा तालुक्यातील हद्दीमध्ये अनेक ठिकाणी लहान साकवाचे काम चालू होते. काही जवळपास साकवाचे काम पूर्ण झाले आहेत. परंतु त्या ठिकाणी खुदाई केलेला रस्ता सद्यस्थितीत पावसामध्ये चिखलाच्या साम्राज्यात आहे. या ठिकाणी आजरा तालुक्यात लागणारा पाऊस पाहता राष्ट्रीय महामार्गाचे एकूण उर्वरित काम फारसं होणार नाही.ते थांबणार आहेच. यासाठी ज्या ठिकाणी साकवाचे काम पूर्ण झाले आहे. तेथील चिखलमय झालेला रस्ता व्यवस्थित करण हे खरंतर सांगण्याची गरज नाही. याच मार्गावर दिवसभर राष्ट्रीय महामार्ग यांची वाहने फिरत असतात साकवा जवळील खड्ड्यातील चिखल रस्त्यावरती येऊन वहाने स्लिप होत आहेत. मागील चार दिवसापासून मोटरसायकल वरून अपघात झालेले आहेत. यामध्ये मोटरसायकल चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या ठिकाणचा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा. “याबाबत शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना निवेदन देऊन बैठकीचे नियोजन करण्यास सांगितले होते”. परंतु त्या बैठकीला देखील जबाबदार अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. पण निवेदनाने केलेल्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष का ? करत आहेत. मागणी जरी रास्त असली किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून रस्तेबाबतची निवेदन दिले पण खऱ्या अर्थाने जर राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना आजरा तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कदाचित माहीत नसावे. याची माहिती घ्यावी. व या नादुरुस्त झालेल्या रस्त्याबाबत संभाव्य धोका आता तरी विचारात घ्यावा. आपण राष्ट्रीय महामार्ग केव्हा करणार त्यावेळी काम चालू ठेवा परंतु सद्यस्थितीला ज्या ठिकाणी आपण खुदाई करून साकवाचे काम केले आहे. त्या ठिकाणचा रस्ता तात्काळ वाहने जाण्यास योग्य असा करावा. पण याकडे देखील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग कडे वर्ग झाल्यामुळे या रस्त्याकडे व पर्यटक स्थानिक नागरिक यांचे होत असलेले हाल याकडे कोणाचे लक्ष नाही. आजरा शहरापासून ते आजरा तालुक्याची हद्द संपेपर्यंत या रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य व अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी रस्ता कधीही करा पण पावसामध्ये जाण्यासाठी योग्य असा सद्यस्थितीला रस्ता करावा अन्यथा आजरा तालुक्यातील नागरिक रस्त्यावर उतरून सद्यस्थितीला चालू असलेले काम बंद पाडतील अशा अवस्थेत नागरिक असल्याचे बोलले जाते. ज्या ठिकाणी साकवाचे काम पूर्ण झाले आहे. येथील बाजूच्या शेतामध्ये साकवाचे काम करताना शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये माती दगड टाकलेलं होतं. अद्याप काही ठिकाणी जैसे थे आहे. पेरणी चालू असताना त्या शेतकऱ्याचे शेत रिकामी करून देणे बंधनकारक असताना त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी शेतामध्ये येणार आहे. त्या ठिकाणी पीक घेता येणार नाही. व बाजूचे पीक देखील पाण्याखाली जाणार आहे. सदर शेतकऱ्यांना ज्या – ज्या ठिकाणी साकवाचे काम केले आहे तेथील दगड माती काढून घेऊन साकवाच्या मार्गाने पाणी जाण्यास मार्ग रिकामी करावा. अशी मागणी पर्यटक आजरा तालुक्यातील नागरिकांच्या कडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.