पेंढारवाडी नजीक आयशर ट्रकचा अपघात; चालकाचा मृत्यू
आजरा : – प्रतिनिधी.
आजरा-आंबोली मार्गावरील पेंढारवाडी गावाजवळ आंबेहोळ पुलानजीक रविवारी (दि. २७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक रामलखन गंगाराम जाधव (वय ४०, रा. निवर्गा, कळबुर्गी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक क्रमांक MH 11 DV 1377 हा चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने अपघात झाला. अपघातात वाहनाचे नुकसान झाले तसेच चालक गंभीर जखमी होऊन मयत झाला. याप्रकरणी पोलीस पाटील सुभाष गुड आजगेकर यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मकानदार करीत आहेत.
