भारतीय जनता पार्टीचा ४३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.- वर्धापन दिनाच्या निमित्ताने २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे वाटप. – ता. अध्यक्ष सुधीर कुंभार.
आजरा.- प्रतिनिधी.

मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आजरा तालुक्यातील जेष्ट व श्रेष्ठ ज्यांच्या योगदानातून पक्ष उभा राहिला आहे.
या सर्वांना प्रथमतः आदरांजली या व सध्याच्या कार्यरत असलेल्या पदाधिकारी यांनी अहोरात्र पक्षासाठी वेळ देऊन पक्ष वाढवण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे घरोघरी पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे व त्याचे फळ म्हणून आज भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातल्या अनेक राज्यासह देशपातळीवर होऊन पोहोचवला आहे प्रथमतः या सर्व पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वांना प्रथम शुभेच्छा यापुढेही येणाऱ्या काळात पक्षाची ध्येय धोरणे लोकांच्या पर्यंत पोहोचवून होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने कार्य करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे वाटप करण्यात आले. दिवसभरामध्ये मतदारसंघांची पुनर्बांधणी पक्ष बांधणी याबाबतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी माहिती दिली.

