Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा बस स्थानकाचा तोरण बांधून प्रतीकात्मक उद्घाटन सोहळा संपन्न.-( उद्घाटनापासून प्रलंबित वास्तू...

आजरा बस स्थानकाचा तोरण बांधून प्रतीकात्मक उद्घाटन सोहळा संपन्न.-( उद्घाटनापासून प्रलंबित वास्तू .- आजरा पोलीस स्टेशन क्रीडा, संकुलन या इमारतींचा येणाऱ्या आठ दिवसात प्रतीकात्मक उद्घाटन करणार.- जिल्हाप्रमुख विजय देवणे.)

आजरा बस स्थानकाचा तोरण बांधून प्रतीकात्मक उद्घाटन सोहळा संपन्न.-
( उद्घाटनापासून प्रलंबित वास्तू .- आजरा पोलीस स्टेशन क्रीडा, संकुलन या इमारतींचा येणाऱ्या आठ दिवसात प्रतीकात्मक उद्घाटन करणार.- जिल्हाप्रमुख विजय देवणे.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील बस स्थानकाचा प्रतीकात्मक तोरण बांधून उद्घाटन सोहळा गुरुवार दि. ६ रोजी १२ वा. संपन्न झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व उपसंघटक संभाजी पाटील युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आजरा बस स्थानक शिवसैनिकांनी घोषणा देत प्रलंबित राहिलेला बस स्थानकाचा उद्घाटन सोहळा त्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री देवणे म्हणाले खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर, यांनी विकासासोबत या इमारतीकडे लक्ष द्यावे व धूळ खात पडलेल्या इमारतींचा शुभारंभ होऊन ती त्या विभागाच्या ताब्यात देऊन हस्तांतर करावे. अन्यथा येणाऱ्या आठ क्रीडा संकुलन व आजारा पोलीस स्टेशन या इमारतींचा उद्घाटन सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करणार असल्यास ची घोषणा यावेळी केली यावेळी तालुका प्रमुख युवराज पवार यांनी बस स्थानका मंजुरी पासून शिवसेनेने केलेले आंदोलन यामुळे बस स्थानक उभा राहिले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षामुळे हस्तांतर व उद्घाटनाकडे दुर्लक्ष प्रलंबित राहिल्यामुळे सदर बस स्थानकाचे उद्घाटन करत आहोत आजरा शहर व तालुक्यातील जनतेसाठी असणारे बस स्थानक म्हणजे आजरा शिवसेनेच्या आंदोलनाचे यश आहे. १९७२ चार पत्रा गाळे मध्ये बस स्थानक होते त्यावर सिमेंटचे पत्रे होते या ठिकाणी छप्पर गळती खाण्याचे साम्राज्य प्रचंड झाले होते हा प्रश्न घेऊन शिवसेनेच्या वतीने संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०१३ साली आजरा बस स्थानक येथे पहिले आंदोलन झाले. यानंतर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी यांच्या समावेत परिवहन विभाग कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले यानंतर २०१४ साली राज्यात सत्ता बदल होऊन शिवसेनेचे दिवाकर रावते परिवहन मूर्ती झाले तालुक्यातील सर्व पदाधिकारी व जिल्हाप्रमुख विजयदेवनी यांच्यासह मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन बस स्थानकाची परिस्थिती सांगून व याची दखल घेत परिवहन माजी मंत्री श्री रावते यांनी परिवहन विभागाला सूचना देऊन ७५ लाख रुपये निधीची तरतूद केली व सदर पत्र मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय यांना पाठवण्यात आले. व ३/३/२०१८ भूमिपूजन सोहळा पार पडला होता. यानंतर बस स्थानकाचे काम होऊन आज दोन वर्षे झाली तरी बस स्थानक आजरा आगार कडे हस्तांतर न केल्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये पाळीव प्राण्यांचा वावर वाढत आहे उन्हाळ तरुण मंडळी अनुचित प्रकार करत आहेत काही प्रकार घडत आहेत यामुळे या बस स्थानकाचा प्रतीकात्मक उद्घाटन सोहळा पार पडत आहे असे बोलताना श्री पोवार म्हणाले यावेळी उपसंघटक संभाजी पाटील, उपतालुकाप्रमुख संजय येसादे, शहर प्रमुख ओमकार माधाळकर युवा सेनेचे महेश पाटील विभाग प्रमुख दिनेश कांबळे, सुनील डोंगरे अरुण कांबळे, नारायण कांबळे सह शाखाप्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.