HomeUncategorizedकै. केदारी रेडेकर २५ वे पुण्यस्मरण.- कै केदारी रेडेकर यांच्या आठवणीचा उजाळा...

कै. केदारी रेडेकर २५ वे पुण्यस्मरण.- कै केदारी रेडेकर यांच्या आठवणीचा उजाळा देणारा शिक्षण प्रसारक मंडळ पेद्रेवाडी – २५ वा रोप्य महोत्सव उत्साहात संपन्न.

कै. केदारी रेडेकर २५ वे पुण्यस्मरण.- कै केदारी रेडेकर यांच्या आठवणीचा उजाळा देणारा शिक्षण प्रसारक मंडळ पेद्रेवाडी.- २५ वा रोप्य महोत्सव उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

कै. केदारी रेडेकर २५ वे पुण्यस्मरण व केदारी रेडेकर हायस्कूल रौप्य महोत्सव शुक्रवार १० रोजी पेद्रेवाडीत येथे संपन्न झाला.
शिक्षण प्रसारक मंडळ पेद्रेवाडीत ता.आजराचे संस्थापक अध्यक्ष कै.केदारी रेडेकर यांचे २५ वे पुण्यस्मरण व कै. केदारी रेडेकर हायस्कूलचा रौप्यमहोत्सव या निमित्ताने शुक्रवार दि.१० रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र कचरे माजी.नगरसेवक मुंबई होते. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती अंजनाताई रेडेकर अध्यक्षा केदारी रेडेकर समुह संचालिका गोकुळ संघ यांनी केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मच्छिंद्र कचरे म्हणाले कै केदारी केदारी हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नगरसेवक होते. शिवसेनेची महाराष्ट्रला गरज आहे व महाराष्ट्र जगला तर हिंदुस्थान जगेन या जोमाने कै. केदारी यांचे काम होते.
पंचवीस वर्षानंतर आज पुण्यस्मरण निमित्ताने निघालेली आज मिरवणूक पाहता आजही असं वाटतं की परमेश्वराने अजून केदारी यांना वेळ दिला असता आणखी बरंच काही त्यांनी केलं असतं हे त्यांचे कर्तृत्व होतं त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही काळी होतो आजही आहे आणि उद्याही आहे असे अध्यक्ष स्थानावरून श्री कचरे बोलताना
यावेळी बोलताना म्हणाले. माजी महापौर सौ पेडणेकर म्हणाल्या सर्वांच्या मनामध्ये असणारे केदारी रेडेकर हे एक स्मृती जपणारे कर्तुत्वान व्यक्तिमत्व होतं ते आपल्यापासून देवाने हिरावून घेतले वहिनीसाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्वांनी मिळून केदारी रेडेकरांची स्मृती जपूया असे सौ पेडणेकर म्हणाल्या
या कार्यक्रम प्रसंगी स्मरणिका प्रकाशन किशोरी पेडणेकर माजी महापौर मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले. तसेच फार्मस पॅकेज पॉलिसी वाटप गोकुळ दुध संचालक यांच्या शुभ हस्ते झाले.
शिवसेनेचे शाखाप्रमुख गोपाळ खाडे, राम साळगावकर भारतीय कामगार सेना, सखाराम नरोटे निवृत्ती कबीर यांनी मनोगते व्यक्त केले. गोकुळ संचालक शशिकांत चूयेकर यांनी गोकुळ परिवार रेडेकर कुटुंबियांच्या पाठीशी असेल असे आपल्या मनोगत बोलताना सांगितले
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती.
मुकुंददादा देसाई, अनिरुद्ध रेडेकर, सुधीर देसाई, विष्णुपंत केसरकर, जितेंद्र टोपले, वसंतराव धुरे, संभाजी पाटील, अनंतराव कुलकर्णी, शिवाजी बोलके, अल्बर्ट डिसोझा, युवराज पोवार, मारुती घोरपडे, राजेंद्र सावंत, दिगंबर देसाई, अनिल फडके, सह कोल्हापूर जिल्ह्यातील माजी जि.प. सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख उपस्थितीत होते. पी.एस. शिपूरकर सचिव, प्रणिता शिपूरकर अध्यक्षा स्मरणिका, पांडुरंग ढवळे उपाध्यक्ष, सुनिल चव्हाण मुख्याध्यापक, विश्वनाथ देऊसकर उपसंपादक स्मरणिका मंडळ केदारी रेडेकर हायस्कूल, शारदा व्ही. चव्हाण पतसंस्था, महात्मा फुले दूध संस्था, कमळाबाई दूध संस्था ग्रामस्थ पेद्रेवाडी व संयोजन समितीचे सदस्य
ग्रामस्थ तालुक्यातील रेडेकर गटाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.